Goa Congress Internal Politics  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Internal Politics: गोवा काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण, इच्छुकांची मांदीयाळी

Goa Congress Internal Politics: लोकसभा निवडणुकीतील उमेदवार ठरवण्यावरून काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Internal Politics

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार ठरवण्यावरून काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे.

दिल्लीतील बैठकीत उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करताना वरिष्ठांनी ठरवलेल्या नावांना प्रदेश पातळीवरील नेत्यांची संमती मिळणे कठीण झाले आहे.

यामुळे गोव्यातील केवळ दोन जागांचा गुंता सोडविणे देशभराचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या धुरिणांना कठीण झाले आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून नवा चेहरा देण्याचा विचार काँग्रेसने चालवला होता. प्रदेश पातळीवरून माजी केंद्रीय कायदामंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप आणि प्रदेश सरचिटणीस विजय भिके यांची नावे दिल्लीत पाठवण्यात आली होती.

नवा चेहरा म्हणून भिके यांच्या नावाचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा प्रदेश पातळीवर अनेकांना होती. खुद्द भिके यांनाही आपणास उमेदवारी मिळेल, अशी अजूनही खात्री आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्या नावाचा विचार कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर चालवला आहे.

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत कवठणकर यांच्या नावाची घोषणा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून करावी असे जवळजवळ ठरले होते. आज दुपारी तशी घोषणाही होणार होती; पण काँग्रेसमध्ये सारेकाही सुरळीत होत नसते त्यामुळे कवठणकर यांच्या नावाला तत्काळ आक्षेप घेण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कवठणकर यांना उमेदवारी दिली तर वेगळा विचार करावा लागेल, असे पक्षश्रेष्ठींना कळवल्याने कवठणकर यांच्या नावाचा विचार तूर्त मागे पडला आहे, अशी माहिती दिल्लीतून मिळाली आहे.

पाटकर आणि आलेमाव आपल्या म्हणण्यावर गुरुवारी (ता.28) सायंकाळी उशिरापर्यंत ठाम राहिले तर अ‍ॅड. खलप यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाऊ शकते. तसे झाले तर कवठणकर व भिके समर्थक युवा ब्रिगेड त्यांना कितपत सहकार्य करेल याविषयी शंका आहे. कॉंग्रेसने कोणालाही उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराच्या विरोधात दोन गट असतील, अशी पक्षाची सध्या अवस्था आहे.

सर्व गटातटांना एकत्र ठेवणाऱ्या नेतृत्वाची सध्या वानवा आहे. त्यामुळे तेलंगणध्ये 'कॉंग्रेसजन तितुका मेळवावा'चा प्रयोग करणारे माणिकराव ठाकरेदेखील या गटातटाच्या राजकारणापुढे निष्प्रभ ठरत असल्याचे दिसते.

लोकसभेसाठी इच्छुकांची मांदीयाळी

1) दक्षिण गोव्यातून आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश चोडणकर यांनी केला आहे. यावरून काँग्रेसमधील निर्णय कसे घेतले जातात यावरच त्यांनी नकळतपणे प्रकाश टाकला आहे.

2) दक्षिण गोव्यातून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचीही संसदेत जाण्याची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे. काही दिवसांपूर्वी पाटकर हेही इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होते.

3) कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांना कॉग्रेसने उमेदवारी दिल्यास ते चांगली टक्कर देतील, असे कॉग्रेसमधीलच काही जणांचे म्हणणे आहे.

4) हे सारे सुरू असताना खासदार फ्रान्सिस सादिंन यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी काय खेळी खेळली आहे, याची कल्पना कोणालाच नाही. उत्तर गोव्याप्रमाणे दक्षिण गोव्यातही काँग्रेसला त्यांची गटबाजीच मार देणार असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT