भंडारी समाजातील अंतर्गत मतभेद तीव्र Dainik Gomantak
गोवा

भंडारी समाजातील अंतर्गत मतभेद तीव्र

28 नोव्हेंबर रोजी पणजीतील आजाद मैदानावर सायंकाळी चार वाजता समाजबांधवांचा मेळावा बोलावला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: क्षत्रीय भंडारी समाजातील (Bhandari community) अंतर्गत मतभेद तीव्र झालेले आहेत. अशोक नाईक (Ashok Naik) कार्यकारिणीने आयोजित केलेल्या वधू-वर मेळाव्याच्या दिवशी दुसऱ्या गटाने येत्या रविवारी 28 नोव्हेंबर रोजी पणजीतील आजाद मैदानावर सायंकाळी चार वाजता समाजबांधवांचा मेळावा बोलावला आहे. मोठ्या संख्येने त्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन ॲड. अनीश बकाल व इतरांनी केले आहे.

काल (गुरुवारी) सायंकाळी ॲड. बकाल म्हणाले, समाजाच्या समितीचा कार्यकाळ संपलेला आहे. तिला कोणताच धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. अनेक बेकायदेशीर कृत्ये व राजकारण करत असल्याचा आरोप बकाल यांनी केला असून, मेळाव्यात हे सर्व गैरप्रकार उघड केले जातील, असे सांगितले. समितीच्या या गैर प्रकारांविरुद्ध एक समाजबांधव उदय तिरोडकर हे त्याचदिवशी सकाळी 9 ते 5 या वेळेत आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणी सर्व समाजबांधवानी एकत्र यावे, असे आवाहन केले.

सत्येंद्र कांबळी म्हणाले, समाजाने स्थापनेची 105 वर्षे पूर्ण केली असली तरी अंतर्गत राजकारणामुळे त्याचा अपेक्षीत विकास होऊ शकला नाही, असे सांगितले. समाजाच्या विद्यमान समितीने येत्या 28 रोजी वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. त्याला राजकारण्यांची उपस्थिती का? त्याला राजकीय रंग का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. मुदत संपलेली समिती असे कार्यक्रम कोणत्या जोरावर आयोजित करते, अशी विचारणाही कांबळी यांनी केली.

ॲड. अशिष मांद्रेकर म्हणाले, वधू-वर मेळाव्यासाठी दरडोई 500 रुपये कशासाठी वसूल केले जातात. त्याची पावती का दिली जात नाही. राजकीय पक्षांनी तसेच समाजाच्या इतर नेत्यांनी बांधवांची दिशाभूल बंद करावी, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT