UTAA Goa Split News Dainik Gomantak
गोवा

UTAA: ‘उटा’ संघटनेत उभी फूट, 6 आदिवासी संघटना विभक्त; कार्यकारिणीवरच कारवाईची मागणी

UTAA Goa Split: आठवड्यातील बैठकीत वेळीप यांनी केवळ दोनच मागण्या मान्य झाल्याचे स्पष्ट केले. यावरून वेळीप हे स्वार्थासाठी लोकांना फसवत आहेत हे स्पष्ट होते, असा आरोप देखील शिरोडकर यांनी केला.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील आदिवासी हक्कांसाठी संघर्ष करणारी अग्रगण्य संघटना असलेल्या युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्समध्ये (उटा) आता उभी फूट पडली आहे.

या संस्थेतील आठपैकी सहा प्रमुख आदिवासी संघटनांनी एकत्र येत ‘उटा’ कार्यकारिणीविरोधात गैरव्यवहार, फसवणूक आणि अपारदर्शकतेच्या आरोपांवर आधारित याचिका जिल्हा निबंधक तथा महानिरीक्षक (दक्षिण), मडगाव यांच्याकडे दाखल केल्याची माहिती ‘गाकुवेध’चे नेते गोविंद शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही याचिका ‘उटा’चे कार्यकारी सदस्य प्रकाश वेळीप, दुर्गादास गावडे आणि नानू बांदोलकर यांच्याविरोधात करण्यात आली आहे.

शिरोडकर यांनी सांगितले, की ‘उटा’ ही संस्था आदिवासी समाजासाठी स्थापन केली असली तरी सध्या तिचा वापर काही नेत्यांनी व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी सुरू केला आहे. यामध्ये मंत्रिपदावर असलेल्या मंत्री गोविंद गावडे यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी म्हटले की, त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून सभा घेतल्या जातात आणि राजकारणात वापर केला जातो.

२००७ पासून आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन केले. २०११ मध्ये दोन कार्यकर्ते शहीद झाले. त्यानंतर १२ मागण्या सादर केल्या. त्यापैकी दोन वगळता सर्व मागण्या मान्य झाल्या, असे प्रकाश वेळीप यांनी स्वतः सांगितले होते. पण मागील आठवड्यातील बैठकीत वेळीप यांनी केवळ दोनच मागण्या मान्य झाल्याचे स्पष्ट केले. यावरून वेळीप हे स्वार्थासाठी लोकांना फसवत आहेत हे स्पष्ट होते, असा आरोप देखील शिरोडकर यांनी केला.

शिरोडकर म्हणाले, की, ‘उटा’ ही संस्था आदिवासींची शक्ती होती; परंतु सध्या ती संस्थाच अंतर्गत संघर्ष, वर्चस्ववाद आणि राजकीय प्रभावाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सहा संघटनांनी एकत्र येत थेट याचिका दाखल केल्यामुळे संस्थेतील लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना आणि पारदर्शकता ही आता वेळेची गरज बनली आहे. उटा ही संस्था आता कोणालाही विश्वासात घेत नाही. एकेकाळी आदिवासी हक्कांच्या रक्षणासाठी सत्ताधीशांशी संघर्ष करणारी ही संस्था आता सत्ताधीशांच्या छायेत गेली आहे.

सहा संघटनांच्या मागण्या

२०२२ मधील निवडणूक रद्द करावी

स्वतंत्र प्रशासक नेमावा

आर्थिक कामकाजाचे स्वतंत्र ऑडिट करावे

विद्यमान कार्यकारिणीवर तात्काळ बंदी घाला

प्रकाश वेळीप यांना अध्यक्षपदावरून हटवावे

याचिकादार संस्था अशा...

गावडा, कुणबी, वेळीप व धनगर महासंघ (गाकुवेध) - अध्यक्ष गोविंद शिरोडकर

अखिल गोवा अनुसूचित जमाती संघ - कोषाध्यक्ष रवींद्र कृष्णा गावकर

गौड जात महासंघ गोवा - अध्यक्ष श्रीकांत पालसरकर

आदिवासी कल्याण संघटना - मुख्य आयोजक श्रीकांत बाबू गावकर

ताळगाव आदिवासी कल्याण - कार्यकारिणी सदस्य पोपट गावस

गोमंतक गौड मराठा समाज - सदस्य शंकर बी. गावकर

कार्यकारिणी बेकायदेशीर

या सहा संघटनांनी सादर केलेल्या याचिकेत ३० सप्टेंबर २०२२ रोजी झालेली उटा कार्यकारिणीची निवडणूक बेकायदेशीर ठरवत तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

निवडणुकीसाठी कोणतीही योग्य सूचना देण्यात आलेली नव्हती, काही बनावट प्रतिनिधींचा वापर झाला आणि काही संस्थांची सदस्यता पूर्णतः वैध नाही.

मूलभूत नियमांचे उल्लंघन करत कार्यकारिणीची पुनर्रचना झाली, कार्यकारिणीच्या बैठका नियमित होत नाहीत आणि इतर सदस्यांना कोणत्याही निर्णयात विश्वासात घेतले जात नाही.

‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी संघटनेचा वापर राजकीय कारणासाठी केल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT