Purple Festival DIP Goa
गोवा

Purple Festival: पर्पल आशा! पणजीत आंतरराज्य अंध क्रिकेट स्पर्धेला सुरूवात

वैविध्यतेचा सोहळा म्हणून गणला जाणारा 'पर्पल फेस्ट' राजधानी पणजीत होणार आहे. शुक्रवारपासून 08 जानेवारी 2023 दरम्यान हा महोत्सव होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वैविध्यतेचा सोहळा म्हणून गणला जाणारा 'पर्पल फेस्ट' राजधानी पणजीत होणार आहे. शुक्रवारपासून 08 जानेवारी 2023 दरम्यान हा महोत्सव होणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त, गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, या महोत्सवाची भाग असलेल्या आंतरराज्य अंध क्रिकेट स्पर्धेला पणजी जिमखाना येथे सुरूवात झाली आहे.

Purple Festival

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या आंतरराज्य अंध क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी राज्याच्या अपंग विभागाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव, ताहा हजिक, आयजीपी, ओमवीर सिंग बिश्नोई, आणि डॉ. केतन भाटीकर उपस्थित होते.

Purple Festival

विकलांग व्यक्तींना सुलभपणे रस्त्यावरून जाता-येता यावे, या उद्देशाने आयनॉक्स कोर्टयार्ड, माकिनेझ पॅलेस आणि जुने गोमेकॉ परिसरातील अडथळे हटवण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील इमारतींमध्ये सुलभपणे फिरता यावे यासाठी आवश्यक बदल करण्यात येत आहेत.

Purple Festival

तीन दिवसीय पर्पल महोत्सवात थेट सादरीकरण, प्रदर्शन, क्रीडा उपक्रम, वैविध्यपूर्ण अनुभवात्मक विभाग आणि सर्जनशील मेळा, असे विविध उपक्रम होणार आहेत. तसेच विविध स्पर्धा, चित्रपटांचे स्क्रीनिंग, मेगा कार रॅली यांसह शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि स्वावलंबी जीवन याबाबत चर्चात्मक उपक्रमही या महोत्सवात होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT