Insult and injustice in BJP: Deepak Kalangutkar
Insult and injustice in BJP: Deepak Kalangutkar 
गोवा

भाजपमध्ये अपमान व अन्याय : दीपक कळंगुटकर

गोमंतक वृत्तसेवा

पणजी:  भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकत्यांविरुद्ध अपमान, सतावणूक, अन्याय व सूडाचे वातावरण सुरू असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांपेक्षा आयात केलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनाच अधिक महत्त्व दिले जात असताना पक्षाचे पदाधिकारी काहीच करू शकले नाहीत. हा अन्याय सहन करण्याची सहनशीलता संपल्यानेच भाजपचा राजीनामा देऊन गोवा फॉरवर्डमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण दीपक कळंगुटकर यांनी केले. 

भाजपचे दोन वेळा निवडून आलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच निष्ठावंत नेते दीपक कळंगुटकर यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व आज संध्याकाळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री विजय सरदेसाई यांनी त्यांना पक्षाची निशाणी श्रीफळ व पट्टा देऊन प्रवेश दिला. यावेळी आमदार विनोद पालयेकर व आमदार जयेश साळगावकर उपस्थित होते. दीपक कळंगुटकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात त्यांचे पाठिराखे उपस्थित होते. 

गेल्या २० वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत, प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम केले. मात्र, पक्षाकडून माझा अपमान तसेच अन्याय होऊ लागल्याने त्यातून मार्ग काढण्याचा विचार करत होतो. भाजपच्या कार्यकर्त्यांवर सूड उगवला जात होता ते पाहणे मला शक्य नव्हते. कोरोना महामारीच्या काळात काही शॅकचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या काळात तरी सरकारने या शॅकधारकांना सांभाळायला हवे होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही कार्यकर्ते भारावून गेलो होतो. त्यांची विचारसरणी पटत होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर पक्षाची विचारसरणीच नष्ट झाली. त्यांची पोकळी भरून येऊ शकली नाही. स्थानिक नेते असताना मात्र पक्षाने नेते आयात करण्यास सुरवात केली. स्थानिक नेत्यांवर अन्याय होऊ लागला. भाजपची संघटना पूर्णपणे कोलमडली आहे. गोमंतकीयांच्या हितासाठी पूर्वीप्रमाणेच निष्ठेने काम करणार आहे, असे ते म्हणाले. 

माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड पक्ष एक भाग होता. या पक्षाची विचारसरणी पटल्यानेच पर्रीकरांनी त्यांना सरकारमध्ये घेतले होते. त्यांच्या निधनानंतर या पक्षाला सरकारमधून बाहेर काढण्यात आले. गोवा फॉरवर्ड हा प्रादेशिक पक्ष तसेच गोमंतकीयांचा पक्ष आहे. तो लोकांच्या हितासाठी व जनतेचे प्रश्‍न घेऊन लढत आहे. आतापर्यंत या पक्षाला कोणताच डाग नाही. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असूनही मी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कळंगुटकर यांनी स्पष्ट 
केले. 
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपमधील अनेक कार्यकर्ते दुखावले जात आहेत. मात्र, ते उघडपणे बोलत नाहीत. दीपक कळंगुटकर यांनी हे धाडस करून दाखवले. स्थानिक भाजप नेत्यांचा अपमान व अन्यायाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, तर त्यांनी खुर्ची टिकवण्यासाठी सर्वकाही त्याग केले आहे. ते दिल्ली सरकारचे तसेच पक्षबदलू आमदार व मंत्र्यांचे गुलाम बनले आहेत, अशी टीका आमदार व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. दीपक कळंगुटकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डतर्फे उमेदवारी दिली जाईल. एवढेच नाही, तर त्यांना निवडून आणण्याचे काम पक्ष करणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून पेडणे तालुक्यात मोठ्या नेटाने काम करण्यास लागावे. त्यांचा पक्षात सन्मान होईल मात्र अपमान होणार नाही याची खात्री देत असल्याचे ते म्हणाले. 

दीपक कळंगुटकर हे भाजपसाठी एक महत्त्वाचा नेता होता तो त्यांनी गमावला आहे. त्यांच्याबरोबर मी जिल्हा पंचायत सदस्य असताना एकत्रित काम केले आहे. त्यांचा मांद्रे तसेच पेडण्यात मोठा मित्रवर्ग व त्यांचे पाठिराखे आहेत, असे आमदार जयेश साळगावकर म्हणाले. कळंगुटकर यांना समाजसेवेचा वसा त्यांच्या घराण्यापासून मिळालेला आहे. त्यांनी राजीनामा देणे म्हणजे भाजपला हा मोठा धक्का आहे. त्यांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करून सीमोल्लंघन केले आहे. यापुढेही असे अनेक सीमोल्लंघने होऊन गोवा फॉरवर्ड पक्षाची उत्क्रांती होईल, असे आमदार विनोद पालयेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT