Taxi| Mopa International Airport | Manohar Airport   Dainik Gomantak
गोवा

Manohar Airport: 'मनोहर' विमानतळावर GTDC चा टॅक्सी काऊंटर; टॅक्सी नोंदणीला सुरूवात

नवीन विमानतळावर जीटीडीसीचा टॅक्सी काऊंटर असणार असून तेथे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी सक्तीची केली आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa International Airport: मोपा विमानतळावर टॅक्सी नोंदणीसाठी टॅक्सीवाल्यांना गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) सूचना देण्यात आली आहे. नवीन विमानतळावर जीटीडीसीचा टॅक्सी काऊंटर असणार असून तेथे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी सक्तीची केली आहे. पेडणे तालुक्यातील टॅक्सीवाल्यांना येथे प्राधान्य दिले जाणार असून आजपासून नोंदणीला सुरवात झाली आहे, सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या सूचनेत ‘जीटीडीसी’ने अखिल गोवा टुरिस्ट आणि अखिल भारत परवाना असलेल्या टॅक्सीना नोंदणीसाठी येण्याची सूचना केली आहे. नोंदणीसाठी आवश्‍यक दस्तावेजांची यादी देण्यात आली असून त्यात आरसी प्रत, पथकर, फिटनेस प्रमाणपत्र, प्रदूषण प्रमाणपत्र, टुरिस्ट वाहन म्हणून चालवण्याचा परवाना यांचा समावेश आहे.

टॅक्सीच्या मालकांनी चालकाची पुष्टी केली असून त्याला वाहन चालवण्याची परवानगी देणारे पत्र सादर करावे लागेल. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना आवश्‍यक आहे, तसेच टुरिस्ट वाहन चालवण्यासाठी पात्र आहे.

नोंदणीचा अर्ज संकेतस्थळावर

नोंदणीचा अर्ज पर्यटन खात्‍याच्‍या संकेतस्थळावर किंवा नोंदणी सुविधा केंद्र (आरसीएफ) पर्यटन भवन पाटो - पणजी, उत्तर गोवा आणि माथानी साल्ढाणा संकुल - मडगाव, दक्षिण गोवा येथे उपलब्ध करण्यात आले असल्याचे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT