Rohit Monserrate, Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: स्मार्ट सिटीच्या कामांची 1 मे रोजी पाहणी! महापौर मोन्सेरात; नागरिकांच्या तक्रारींची दखल

Rohit Monserrate: स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जावर नाराजी व्यक्त करणाऱ्या महापौर रोहित मोन्सेरात यांनी १ मे रोजी झालेल्या सर्व कामांची पाहणी केली जाणार असल्याचे सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जावर सोमवारी नाराजी व्यक्त करणाऱ्या महापौर रोहित मोन्सेरात यांनी १ मे रोजी झालेल्या सर्व कामांची पाहणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. कारण मे अखेरपर्यंत गटार, रस्ते, पदपथाची कामे होतील, असे पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) यापूर्वीच न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे.

स्मार्ट सिटीच्या कामे वेळेत होत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याशिवाय जी कामे सुरू आहेत, त्या कामाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जी कामे सुरू आहेत, ती योग्य आहेत की नाहीत याचे निरीक्षण ‘आयपीएससीडीएल’च्या अभियंत्यांकडून होत नाही.

कामे पूर्ण करण्याची जी मुदत दिली आहे, त्यामुळे १ मे रोजी झालेल्या कामांची तपासणी केली जाईल. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे १८ जून मार्गाचे काम बाकी आहे, त्या मार्गाखालूनच पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे गटारांची जोडणीची कामे झालेली नाहीत.

त्याशिवाय या रस्त्याचे काम बाकी असल्याने काय समस्या उद्‍भवू शकतात, हेही तपासले जाईल. १८ जून रस्त्याचे काम न होण्यामागे नियोजनाचा अभाव असल्याचे दिसते, असे महापौर यांनी सांगितले. पोलिस मुख्यालयासमोरील रस्ता डांबरीकरणाचे काम झालेले नाही, हे लक्षात आणून देताच १५ दिवसांत डांबरीकरणाची निविदा काढली जाईल, असे महापौर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT