Court Decision  Dainik Gomantak
गोवा

मित्राच्या खून प्रकरणातून गोव्यातील 'त्या' दोघांची निर्दोष मुक्तता

वेर्णा पोलिसांनी 25 मार्च 2021 रोजी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: खागेन नाथ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले त्याचे मित्र रिडिप अरेन दास आणि दुलाल पोहर दास यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. वेर्णा पोलिसांनी 25 मार्च 2021 रोजी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

27 डिसेंबर 2020 दांडो किनाऱ्यावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पोलिस तपासानंतर मृताचे नाव खागेन नाथ असल्याची माहिती समोर आली. तपासादरम्यान पोलिसांना (Police) एका मद्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खागेन एका व्यक्तीसोबत दारू विकत घेत असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. मडगाव रेल्वे पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ती व्यक्ती मानस नारायण दास असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित मानस दास तसेच याचिकादार रिडिप अरेन दास आणि दुलाल पोहर दास या दोघांना अटक केली. पुढे अजून 4 व्यक्तींची चौकशी करण्यात आली.

एका व्यक्तीने पाचही जणांना दांडो-वेळसांव समुद्र (Sea) किनाऱ्यावर पार्टी करताना पाहिल्याची जबानी दिली होती. संशयित रिडिप आणि दुलाल या दोघांनी खून प्रकरणात आपला सहभाग नसल्याचा दावा न्यायालयालात (Court) केला होता. दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यांनी या निर्णयाला खंडपीठात आव्हान दिले. अखेर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT