कासारपाल-मुळगाव रस्त्याच्या बाजूची झुडूपे छाटली Dainik Gomantak
गोवा

Goa: सरकारची वाट न बघता काँग्रेस कार्यकर्त्यांचा रस्ता दुरुस्तीसाठी पुढाकार

सरकारी यंत्रणांची प्रतीक्षा न करता डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष मेघ:श्याम राऊत यांच्या पुढाकारातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कासारपाल येथून या साफसफाई मोहिमेला सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मुळगाव-दोडामार्ग रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी या रस्त्याच्या बाजूने वाढलेली झुडूपे छाटण्याचे काम अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress workers) हाती घेतले आहे. सरकारी यंत्रणांची प्रतीक्षा न करता डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष मेघ:श्याम राऊत यांच्या पुढाकारातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कासारपाल येथून या साफसफाई मोहिमेला सुरुवात करतांना कासारपाल-नानोडा रस्त्याच्या बाजूची झुडूपे छाटून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. या मोहिमेत मेघ:श्याम राऊत यांच्यासह नझीर बेग, बालाखान गौरी, उमेश परब, हरिश्चंद्र नाईक आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. ग्रास कटर (Grass cutter) आदी यंत्राच्या सहकार्याने रस्त्याच्या बाजूने वाढलेली झुडूपे छाटण्यात आली.

शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

महाराष्ट्राला जोडणाऱ्या मुळगाव ते दोडामार्ग या रस्त्यावरून सदैव वाहनांची वर्दळ असते. मात्र या रस्त्याच्या बाजूने झुडपांचे प्रस्थ वाढले होते.कासारपाल पर्यंतच्या रस्त्याच्या बाजूने तर मोठ्या प्रमाणात झुडूपे वाढली होती. बऱ्याचठिकाणी ही झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीस धोकादायक ठरत होती. झुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने ही झुडूपे लहान-सहान अपघातांनाही कारणीभूत ठरत होती. काल रविवारीही या झूडपांमुळे कासारपाल येथे एक अपघात होऊन एक दुचाकीस्वार जखमी होण्याची घटना घडली होती. महत्वाचा रस्ता असतानाही रस्त्याच्या बाजूने वाढलेली झुडूपे छाटण्याकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष झाले होते. अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनीच हे काम हाती घेतल्याने वाहनचालक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारचा निष्काळजीपणा

अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षित ठेवणे सरकारचे कर्तव्य आहे. मुळगाव-कासारपाल हा रस्ता महाराष्ट्रातील दोडामार्गला जोडल्याने या रस्त्यावरुन दररोज वाहनांचे जाणे-येणे असते. या रस्त्याच्या बाजूची झुडपे छाटण्याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले होते. अपघात टाळण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना अखेर मदतकार्य करावे लागले आहे.

मेघ:श्याम राऊत, अध्यक्ष, गट काँग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT