पणजी: गणेश चतुर्थीच्या तोंडावर 1 सप्टेंबरपासून कदंब (Kadamb Bus) वाहतूक महामंडळ आंतरराज्य बससेवा सुरू करणार आहे. कदंबने आजपासून मडगाव - कुठ्ठाळी - पणजी आणि मडगाव - कारवार मार्गावर विजेवर चालणाऱ्या बस सुरू केल्या आहेत. कदंबची राज्यांतर्गत बससेवा मात्र पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेली नाही.
पणजी - मुंबई - बोरीवली (वोल्वो बस), मडगाव - पुणे (वातानुकुलीत स्लीपर क्लास), वास्को - पणजी - सोलापूर (लक्झरी बस), पणजी - बंगळूर (वोल्वो बस), मडगाव - पुणे (लक्झरी बस) आणि मडगाव - मुंबई - धोबीतलाव (वातानुकुलीत स्लीपर) या बससेवा कदंब वाहतूक महामंडळ 1 सप्टेंबरपासून सुरू करत आहे.
याचसोबत पणजी - शिर्डी व परत, पणजी - हैदराबाद व परत, पणजी - म्हैसूर व परत या मार्गावरील बससेवाही लवकरच सुरू केली जाणार आहे. आंतरराज्य मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आरटी-पीसीआर कोविड चाचणी करून कोविड लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवाशांना सीमेवर शुल्क भरून कोविड चाचणी करून घ्यावी लागणार आहे, असे कदंबने स्पष्ट केले आहे. या मार्गांवरील आरक्षण कदंबच्या WWW.KADAMBAGOWA.COM कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.