Goa News |Wild Animals Dainik Gomantak
गोवा

Wild Animals: नेत्रावळी परिसरात जंगली प्राण्यांचा उपद्रव

पिकांचे नुकसान - पाळीव प्राण्यांचा फडशा; वन खात्याने बंदोबस्त करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

Wild Animals: नेत्रावळी अभयारण्य कक्षेत येणाऱ्या सर्व गावात जंगली जनावरांनी उपद्रव माजवला असून भयानक परिस्थिती आहे. केवळ जंगलाच्या परिघात असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी केली जात नाही तर जनावरे गावात येऊन उभ्या पिकांची नासाडी करत आहेत.

गवे, रानडुक्कर पिकाची नासाडी करतात तर बिबटे पडवीत-गोठ्‍यात असलेल्या कुत्री व वासरांचा फडशा पाडतात हे आता नित्याचे बनले आहे. वनखात्याची कोणतीही योजना नसल्याने शेतकऱ्यांना कपाळावर हात मारून घेण्यापलिकडे काहीच उपाय राहिलेला नाही.

कित्येक भागातील शेतकऱ्यांनी गव्या रेड्याच्या हैदोसाला कंटाळून शेती करणे सोडून दिले आहे. सरकार एका बाजूने शेती करा आणि स्वयंपूर्ण बना म्हणून संदेश देते तर दुसरीकडे सरकारचाच भाग असलेल्या वन खात्याच्या जंगली प्राण्यांकडून उत्पन्न येण्याआधीच नासाडी केली जात आहे. महिलांना काजू बागायतीत फिरणे जोखमीचे बनले आहे.

जंगली जनावरांमुळे आता शेती करणे मुळीच परवडत नाही. जनावरांना अटकाव करण्यास वन खाते अपयशी ठरले आहे.

सांगे तालुका कृषी हब म्हणून विकसित करण्याचे सरकार म्हणते. दुसऱ्या बाजूला जनतेला अभयारण्याची फळे भोगावी लागतात अशी परखड प्रतिक्रिया सर्वच भागांतून उमटू लागली आहे. वन खात्याने जनावरांची सुरक्षा स्वतः करणे आवश्यक असून शेतकरी या जाचाला कंटाळले आहेत.

लोखंडी जाळी घालण्याची आवश्यकता

भात शेतीबरोबर भाजीची लागवड केली होती. गव्यारेड्यांनी दिवसा ढवळ्या शेतीची नासाडी करून नुकसान केले. किती रखवाली करायची, किती काळ रात्रभर जागरण कारायचे? वन खात्याने जनावरांना राखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्राच्या कक्षेत जिथे लोकांच्या पारंपरिक शेती बागायती आहेत तिथे जंगली जनावरे घुसू नयेत म्हणून लोखंडी जाळी घालण्याची गरज आहे. वन खाते जनावरांना खाण्यासाठी हवा असलेल्या झाडा-झुडुपांची मुळासकट छाटणी करत असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीच मिळत नसल्याने ती गावात येत आहेत. - भिसो मोलू गावकर, गावडोंगरी

नुकसानीमुळे शेती करणे बंद

कृषीमंत्री रवी नाईक सांगतात की सांगे भागातील पिकांची जंगली जनावरांनी नासाडी केल्यास नुकसान भरपाई देण्यासाठी खास योजना करण्यात येणार आहे. घाम गाळून हाता तोंडाशी येण्या आधीच पिकाची नासाडी केली जात आहे.

त्यांना नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये दिले जातात. त्यात केलेल्या श्रमाची भरपाई होत नाही. काबाडकष्ट करून काय उपयोग म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assault Case: काणकोणात ज्येष्ठ नागरिकांना मारहाण, उप-जिल्हाधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या घेऱ्यात; कुटुंबाने केले गंभीर आरोप

Bus Accident: भीषण अपघात! बस दरीत कोसळून 42 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

Parra Road: 'हे झाड कधीही कोसळेल!' 2.5 वर्षांपासून दुर्लक्ष; साळगाव सरपंचांचा वन विभागाला 'अल्टिमेटम'

Gold Silver Price: धनतेरसपूर्वी सोन्याचा नवा रेकॉर्ड! भाव 1 लाख 27 हजारांच्या पार; चांदीनंही दाखवली पुन्हा चमक

KBC Viral Video: "मला नियम सांगू नका", करोडपतीच्या सेटवर बिग-बींना उलटउत्तर; 10 वर्षांच्या स्पर्धकावर नेटकऱ्यांची टीका

SCROLL FOR NEXT