पणजी - काँग्रेसमधून (Congress) आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये (BJP) गेलेल्या दहा आमदारांना (MLAs) परत काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असे काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी आज सांताक्रूझ येथे स्पष्ट केले. सांताक्रुज गट काँग्रेस समितीच्या सदस्यांची चर्चा करताना त्यांनी वरील प्रमाणे विधान केले. (Ineligible MLAs will not be allowed to re-enter Congress)
नीळकंठ हळर्णकर, आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, आंतोनिओ फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, विल्फ्रेड डिसा, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, क्लाफासियो डायस, इजिदोर फर्नांडिस आणि चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता काँग्रेसमधून भाजप मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने सादर केलेली अपात्रता याचिका विधानसभेच्या सभापतीनी फेटाळले असून काँग्रेसने आता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
काँग्रेस सोडून गेलेल्या या आमदारांना काँग्रेस पक्ष पुन्हा परत देईल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटते आहे. त्यामुळे राव यांना हे स्पष्टीकरण आता द्यावे लागत आहे. हे आमदार निघून गेल्यानंतर पक्ष संघटना टिकवून ठेवलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यामधूनच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडला जावा अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.