Goa Fungus in Ration Rice Dainik Gomantak
गोवा

Goa Fungus in Ration Rice: खाण्यालायक नसलेला तांदूळ लोकांच्या माथी मारला- माजी महसूल मंत्र्यांची सरकारवर टीका

लोकांसाठी लोकांच्याच पैशातून आणलेले धान्य खाण्यालायक नसणे हे खेदजनक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fungus in Ration Rice लोकांना धान्य देण्याअगोदर सरकारने ते तपासून देणे गरजेचे होते. लोक खातात म्हणून कसलेही अन्न देऊ नये. कारण सरकार जे लोकांना अन्न देतात ते त्यांच्याच पैशातूनच दिले जाते. लोकांचे आरोग्य सांभाळणे, तितकीच जबाबदारी सरकारची आहे.

जो तांदूळ खाण्यालायक नाही तो लोकांच्या माथी मारला ही खेदजनक बाब आहे. असा खोचट टोला माजी महसूल मंत्री जूझे फिलीप डिसोझा यांनी निकृष्ट तांदळाविषयी मारला.

याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी माजी महसूल मंत्री जूझे फिलिप डिसौझा यांनी केली आहे.

मुरगाव तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानातून किडलेला व निकृष्ट दर्जाचा तांदुळ रेशन कार्डधारकांना वितरीत केल्याने याला वाचा फुटून हे प्रकरण सध्या गाजत आहे. लोकांनीही सरकारच्या नावाने बोटे मोडण्यास सुरुवात केली आहे.

याविषयी माजी महसूल मंत्री फिलिप डिसोझा यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करून नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावर भाष्य करताना स्वस्त धान्य दुकानात धान्य देताना नागरी पुरवठा खात्याने ते तपासून पाहणे गरजेचे आहे.

तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनी लोकांना धान्य देण्या अगोदर ते तपासून मगच लेकांना दाखवून वितरण करणे तितकेच गरजेचे आहे. या गोष्टी सरकारने तसेच नागरी पुरवठा खात्याने केल्या नाही म्हणून आज एवढा मोठा गाजावाजा झाला.

तेच धान्य जर तपासून दिले असते तर आज एवढा मोठा गाजावाजा झाला नसता. ही मोठी चूक सरकारकडून घडलीय. सरकार लोकांसाठी इतके धान्य आणते ते लोकांच्याच पैशातून. त्यासाठी कोणतीही वस्तू लोकांना देताना ती खाण्यालाक असली पाहिजे असे डिसौझा म्हणाले.

तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना हा निकृष्ट दर्जाचा तांदुळ परत देण्यास सांगितले. याचा खर्च कोण देणार गाडी भाडे, हमाली याचा खर्च वाढला. यावर सरकारने विचार करणे गरजेचे आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना परवडणार नाही. सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना सबसीडी द्यावी जेणेकरून त्यांच्या खर्चावर नियंत्रण येईल असे फिलिप डिसोझा सांगितले.

दरम्यान संचालकांनी कुठ्ठाळी येथील जाऊन तपासणी केली, तसेच काही स्वस्त धान्य दुकान तपासणी करून चौकशी केली. नंतर पार्सेकर यांनी गोदामातील दहाच्या आसपास गोण्या तांदूळ खराब झाल्याचे सांगत व्हायरल फोटो, व्हीडीओ गोदाम गोण्यांचे व तांदळाचे नसल्याचे सांगितले.

त्यांचा हा दावा मुरगाव तालुक्यातील अनेक दुकानदारांनी त्यांच्याकडे असलेला साठा उघड करून फोल ठरवला आहे. अशा प्रकारचे सर्वसामान्यांना धान्य देणे दुर्दैवी गोष्ट असून नागरीपुरवठा मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.

तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी माजी महसूल मंत्री जूझे फिलिप डिसौझा यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

VIDEO: तरुणीला मागे बसवून झिगझॅग स्टाइलमध्ये चालवली बाइक; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT