AAP Goa | Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘खंडणी’मुळे उद्योग गोव्याबाहेर : ॲड. पालेकर

Panaji News : वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आम आदमी पक्षावर केलेली टीका कोणताही अभ्यास न करता होती हे त्यांच्या ‘स्टॅटेस्टीक्स’वरून उघड होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, दक्षिणेत भाजपच्या आमदारांचे वर्चस्व असूनही पराभव पत्करावा लागल्याने गोव्यातील भाजप पक्ष बिथरला आहे.

वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आम आदमी पक्षावर केलेली टीका कोणताही अभ्यास न करता होती हे त्यांच्या ‘स्टॅटेस्टीक्स’वरून उघड होते. मुरगाव बंदरात या स्थानिक आमदाराच्या कथित खंडणी संकल्पामुळे काही उद्योग गोव्यातून निघून गेले. मंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या या आमदाराला पुढील विधानसभेत ‘पेन्शनर’ची भूमिका बजावावी लागेल असे रोखठोक उत्तर ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे यांनी धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे दक्षिणेत हार पत्करावी लागली तर अयोध्येत श्रीराम मंदिर बांधूनही तेथील मतदारसंघातील भाजप उमेदवारांना दारून पराभव पत्करावा लागला.

दक्षिण गोव्यात भाजपला जी २ लाख मते मिळाली ती कोणाची होती त्याचे स्पष्टीकरण त्यांनी करावे. वास्कोचे आमदार आमोणकर यांच्या खंडणीप्रकाराने आदित्य बिर्ला कंपनी मुरगाव बंदरातील काम सोडून गेली, असा आरोप पालेकर यांनी केला. वास्कोतून मतांची मोठी आघाडी देण्याचे दिलेल्या आश्‍वासनानंतर त्यांना सुमारे २ हजारांची आघाडी देता आली. संकल्पना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.

दिल्लीत स्वतंत्रपणे लढू, पण ‘इंडी’द्वारेच

दिल्लीत ‘आप’ स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार असला तरी गोव्यात ‘आप’ इंडी आघाडीद्वारेच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. इंडी आघाडीद्वारे लोकसभा निवडणूक लढवण्याचा तर विधानसभा स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय ‘आप’ने अगोदरच घेतला होता. दिल्लीतील जनता नेहमी लोकसभेसाठी भाजपला तर विधानसभेसाठी ‘आप’च्या पाठिशी राहिली आहे, पालेकर यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT