Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

Goa Cyber Crime: संयुक्त अरब अमिरातीमधील फर्स्ट अबू धाबी बँकेत नोकरीचे आमिष दाखवत चिंबल येथील तरुणीचा विनयभंग केल्याची घटना.

Pramod Yadav

Goa Cyber Crime

चिंबल, गोवा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंबलच्या तरुणीला संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात मोठी बँकेत नोकरीचे आमिष दाखवत तिचा विनयभंग करण्यात आला.

याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंबल येथील तरुणीला संयुक्त अरब अमिरातीमधील फर्स्ट अबू धाबी बँकेत नोकरीचे आमिष देण्यात आले. तरूणीच्या फेक मुलाखतीदरम्यान तिला कपडे काढण्यास सांगितले, यावरुन तरुणीला ब्लॅकमेल केले.

तरुणीने पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. दरम्यान, गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने अज्ञात इंस्टाग्राम अकाऊंटविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: पैशांची हानी, आरोग्याचा त्रास; 'विष योगा'मुळे 'या' 3 राशींनी काळजी घेण्याची गरज

Goa Swimming Pool: गोव्यात आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचा प्रस्ताव! आमदार कामत यांची माहिती; मोठ्या स्पर्धा घेणे शक्य

Matoli Goa: ..बाळ भक्ता लागे तूचि आसरा! गणरायाच्या आगमनाची तयारी; 'माटोळी'साठी पावले वळली रानाकडे

Margao Canacona Bus: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मडगाव-काणकोण मार्गावर नवीन कदंबा सुरु; उशिरा प्रवासाची समस्या संपणार

Ponda: फोंडा बाजारात दुर्गंधीचे साम्राज्य! गटार व्यवस्था कोलमडली; लाद्या रस्त्यावर, पालिकेचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT