IndiGo in-flight entertainment Delhi- Goa Flight
IndiGo in-flight entertainment Delhi- Goa Flight Dainik Gomantak
गोवा

IndiGo in-flight entertainment: आता विमानात मनोरंजन! दिल्ली ते गोवा फ्लाईटमध्ये इंडिगोची ट्रायल सुरु

Pramod Yadav

IndiGo in-flight entertainment Delhi- Goa Flight

विमान प्रवासात प्रवाशांसाठी मनोरंजन सेवा देण्याचा इंडिगो एअरलाईन्स विचार करत आहे. इंडिगो सध्या या सेवेची चाचपणी करत असून, दिल्ली - गोवा फ्लाईटमध्ये चाचणी केली जाणार आहे.

येत्या एक मेपासून दिल्ली - गोवा फ्लाईटमध्ये इंडिगो पहिल्यांदाच विमान प्रवासात मनोरंजन सुविधा सुरु करणार आहे.

इंडिगोच्या अॅपबेस मनोरंजन सुविधांचा विमान प्रवाशांना आनंद घेता येणार आहे. विमानात मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास सुयोग्य परिस्थिती (म्हणजेच विमानाने ठराविक उंची गाठल्यानंतर) आल्यानंतर या सुविधांचा वापर करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीच्या वतीने पुढील तीन महिने यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, प्रवाशांना इंडिगोच्या या मनोरंजन सेवेचा आनंद घेण्यासाठी स्वत:चा हेडफोन वापरावा लागणार आहे.

चाचणी यशस्वी झाल्यानंतर कंपनी या सेवेचा सर्व विमानात विस्तार करण्याचा विचार करत आहेत. प्रवाशांचा सुखद विमान प्रवास व्हावा यासाठी कंपनी ही सेवा सुरु करत आहे. इंडिगोच्या 350 विमाने आणि रोजच्या सुमारे दोन हजार फ्लाईट्स आहेत. सेवेचा विस्तार करण्यासाठी दिल्ली-गोवा विमानातील चाचणी महत्वाची मानली जात आहे.

इंटरग्लोब या इंडिगो कंपनीचाच भाग असलेल्या ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रजत भाटीया यांनी या उपक्रमासाठी भारतीय हवाई उड्डाण खाते करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले.

सध्याचे सरकार नागरी उड्डाण क्षेत्रात प्रगतीसाठी करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक करताना भाटीया गेल्या तीस वर्षात असे काम पाहिले नसल्याचा उल्लेख केला. देशात हवाई क्षेत्रात पायाभूत सुविधांचा देखील विस्तार होत असल्याचे भाटीया म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa News : समान नागरी कायदाप्रश्‍नी मोदींकडून गोव्याचे कौतुक

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

SCROLL FOR NEXT