Abu Dhabi To Mopa Goa Direct Indigo Flight Dainik Gomantak
गोवा

Flights from Goa: आता गोव्यातून थेट अबू धाबीला कनेक्टिव्हिटी, चार दिवसात सुरु होणार विमानसेवा

भारतातील आठ शहरातून आठवड्यातील 52 वेळा इंडिगोच्या फ्लाईट आबू धाबीसाठी उड्डाण घेईल.

Pramod Yadav

Abu Dhabi To Mopa Goa Direct Indigo Flight: उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अबू धाबी दरम्यान डायरेक्ट फ्लाईट सुरू करण्याची घोषणा इंडिगोने केली आहे. येत्या 02 सप्टेंबर 2023 पासून या नवीन मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे.

जागतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून आणि गोवा व मध्य पूर्वेतील प्रवाशांची मागणी विचारात घेता ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

इंडिगोच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबीला थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून 02 सप्टेंबर 2023 पासून आठवड्यातून तीनवेळा विमानसेवा सुरू राहणार आहे. गोव्यासह दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोची आणि हैदराबाद या पाच प्रमुख भारतीय शहरांशी विमानसेवा जोडणे कंपनीचा उद्देश आहे.

अशी असेल फ्लाईट

फ्लाईट नंबर 6E 1505 मोपा ते अबू धाबी - सोमवार, गुरूवार आणि शनिवार आणि याच दिवशी फ्लाईट 6E 1506 अबू धाबी ते मोपा सेवा पुरवेल.

'मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते आबू धाबी दरम्यान विमानसेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. मध्य पूर्व भागात विमानप्रवास करणे आणखी सोपे झाले आहे. भारतातील आठ शहरातून आठवड्यातील 52 वेळा इंडिगोच्या फ्लाईट आबू धाबीसाठी उड्डाण घेईल.' अशी माहिती इंडिगो सेल्स हेड विनय मल्होत्रा यांनी दिली.

UAE ची राजधानी अबू धाबी, शेख झायेद ग्रँड मशिदीसह, आलिशान शॉपिंग सेंटर्स, वास्तुकला आणि सांस्कृतिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. तर, गोवा देखील समुद्रकिनारे, निसर्ग सौदर्य, ऐतिहासिक वास्तू, खाद्य पदार्थ आणि संस्कृती यासाठी प्रसिद्ध आहे. नव्या कनेक्टेव्हिटीमुळे दोन्ही शहरे पर्यटनस्थळे जवळ येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT