Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

कचरा विल्हेवाटीबद्दल मडगाव पालिकेत पुन्हा एकदा अनास्था

ओल्‍या कचऱ्याचा भार: मागच्‍या 20 दिवसांपासून वीज गायब

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: सोनसोडो कचरा यार्डवर कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेल्या शेडमध्ये कचरा वाढल्याने या शेडजवळ असलेली भिंत कोसळण्‍याची घटना आज सकाळी घडली. या घटनेने कचरा ची मडगाव पालिकेची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

एका बाजूचे भिंतीचा कठडा कोसळला असल्याने कचरावाहू ट्रक आणि कोपॅक्टरना नियोजित ठिकाणी कचरा टाकण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. हा प्रकार सकाळी सातच्या सुमारास घडला. असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कचरा

वाहतूक करणारा ट्रक येथे कचरा टाकण्यासाठी आला असता हा प्रकार निदर्शनास आला. कठडा कोसळत्यावेळी या ठिकाणी काम करीत असलेले कामगार तेथे नसल्याने प्राणहानी टळली.मागचे 20 दिवस येथील वीज यंत्रणा बंद असल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंद झाले आहे. त्‍यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर ओला कचरा साठून पडला होता. याच कचऱ्याच्या वजनाने ही भिंत कोसळली. कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेल्या या शेडमध्ये प्रक्रिया करून ठेवलेला कचरा साठविण्यात येत असतो. कठडा कोसळल्या ठिकाणी असाच कचरा साठविण्यात आला होता. तो अतिरिक्त प्रमाणात साठविण्यात आला असल्याने हा कठडा कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या कचरा यार्डवर मागील काही दिवसापूर्वी आग लागून येथील कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेलं बेलिंग मशीन, वीज ट्रान्सफॉर्मर तसेच इतर साहित्य मिळून एकंदरीत 40 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT