Green School Goa Dainik Gomantak
गोवा

Green School Goa:'विठ्ठल रखुमाई', साखळीत देशातील पहिली 'ग्रीन शाळा'; शुक्रवारी होणार उद्घाटन

'श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा' साखळी असे या शाळेचे नामकरण करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Green School Goa: देशातील पहिली 'ग्रीन शाळा' गोव्यात तयार झाली असून, उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. विठ्ठलपूर, साखळी येथे असणाऱ्या या प्राथमिक शाळेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत शुक्रवारी (दि.03) या शाळेचे उद्धाटन करणार आहेत.

'श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा' साखळी असे या शाळेचे नामकरण करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच दत्ताप्रसाद खारकांडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जुनीच असणाऱ्या या शाळेची उभारणी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी केली होती. इमारत जुनी झाल्याने याठिकाणी अत्याधुनिक व हरित शाळा उभारण्याचा संकल्प माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी केला होता. 2017 साली या तत्कालीन सभापती आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती.

चार वर्षांच्या कामानंतर शाळा उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. कोरोना काळात इमारतीच्या कामाला विलंब झाला होता. इमारतीमध्ये पुरेशी हवा खेळती राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य तसेच देशातील हरित शाळेचा हा पहिलाच अधुनिक प्रयोग आहे.

भव्य, प्रशस्त आणि आधुनिक शाळा

शाळेची तीन मजली इमारतीत विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तळमजल्यावर भव्य सभागृह आणि आकर्षक वर्ग उभारले आहेत. प्रशस्त या शाळेत सोळा वर्ग आहेत. सभागृहाच्या बाजूला नृत्य आणि संगीत कक्ष उभारण्यात आला आहे. अद्यावत बाकडे आणि फळे व लहान मुलांना खेळण्यासाठी देखील कक्ष उभारण्यात आला आहे.

याशिवाय वरच्या मजल्यावर योग प्रशिक्षण साधना केंद्र तयार करण्यात आला आहे. प्रत्येक मजल्यावर मुले-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. तसेच, रंगमंच, वाचनालय आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

भास्कर वागळे या शाळेचे शिल्पकार असून, यासाठी तार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोवा पायाभूत विकास महामंडळातर्फे शाळेचे बांधकाम करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कोळसा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या गोव्यातील लोकांना NAPM कडून पाठिंबा

Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

Bicholim Water Crisis: डिचोलीत 3 दिवसांपासून नळ कोरडे! जनतेत संताप; पाण्यासाठी गृहिणींवर अश्रू गाळण्याची पाळी

Goa Crime: खोटे 'आधार कार्ड' दाखवून दिली डिजिटल अरेस्टची धमकी! कासावलीतील व्यक्तीला 2 कोटींचा गंडा; संशयिताला अटक

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात वंदे-मातरमची मुले उपाशी...

SCROLL FOR NEXT