Indian Submarine Accident With Fishing Boat 
गोवा

Indian Navy Goa: 'त्या' 2 मच्छिमारांचा मृत्यू; आठ दिवसांनी सापडले मृतदेह, नौदलाची पाणबुडी आणि नौकेचा झाला होता अपघात

Indian Submarine Accident With Fishing Boat: बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी नौदलाने सर्च ऑपरेशन सुरु केले होते.

Pramod Yadav

वास्को: भारतीय नौदलाची पाणबुडी आणि मासेमारी नौकेच्या अपघातात बेपत्ता झालेल्या दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला असून, तब्बल आठ दिवसांनंतर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भारतीय नौदल आणि ओएनजीसी यांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये २८ नोव्हेंबर रोजी मृतदेह शोधण्यात यश आले. २१ नोव्हेंबर रोजी मार्थोमा मासेमारी बोटीसोबत झालेल्या अपघातात दोन मच्छिमार बेपत्ता झाले होते.

भारतीय नौदलाची पाणबुडी आणि मासेमारी बोट 'मार्थोमा' यांचा 21 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी गोव्याच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे 70 नॉटिकल मैलांवर अपघात झाला. मासेमारी बोटीत यावेळी १३ मच्छिमार होते. अपघातानंतर ११ मच्छिमारांना वाचविण्यात यश मात्र दोन मच्छिमार बेपत्ता होते. बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी नौदलाने सर्च ऑपरेशन सुरु केले होते.

नौदलाच्या पाणबुडीने धडक दिल्याने मार्थोमा मासेमारी बोट बुडाली होती. बेपत्ता दोघांचा शोध घेण्यासाठी नौदलाने तटरक्षदल आणि मुंबईतील युनिटची देखील मदत घेतली होती. चॉपरच्या मदतीने देखील बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यात आला. अखेर ओएनजीसीच्या मदतीने बेपत्ता दोघांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे

कसा झाला अपघात?

मार्थोमा बोट मासेमारीसाठी समुद्रात असताना भारतीय नौदलाची पाणबुडी अचानक वर आली त्याचच बोट उलटी झाली व हा अपघात झाला, असा दावा केला जात आहे. अपघात झाला त्यावेळी बोटीवर १३ व्यक्ती होते दरम्यान तात्काळ सुरु केलेल्या बचाव मोहिमेत ११ जणांना वाचविण्यात यश आले. तर, दोघेजण बेपत्ता झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma: वीरेंद्र सेहवागचा 'तो' ऐतिहासिक विक्रम धोक्यात! ऑस्ट्रेलियात 'हिटमॅन' रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी

Goa Live Updates: मडगावात फ्लॅटला आग लागून हानी

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

Fatorda Stadium: स्टेडियमसाठी जागा दिलेल्यांना मिळणार घराची मालकी, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; विजय सरदेसाईंनी घडवून आणली कुटुंबीयांची भेट

Horoscope: पैशांचा पाऊस पडणार! गुरुवारी अचानक होणार धनलाभ, 'या' 3 राशींचे नशीब चमकेल आणि आर्थिक स्थिती होईल मजबूत

SCROLL FOR NEXT