Malvan Anti Submarine Warfare Ship Dainik Gomantak
गोवा

Indian Navy Malvan Warship: भारतीय नौदलाची ताकद वाढणार! 'मालवण' युद्धनौका 22 जुलैला ताफ्यात, समुद्री सुरक्षेला मिळणार नवी धार

Malvan Anti Submarine Warfare Ship: भारतीय नौदलाच्या युद्धसामर्थ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार असून, ‘माहे’ श्रेणीतील दुसरी पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘मालवण’ २२ जुलै रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल केली जाणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भारतीय नौदलाच्या युद्धसामर्थ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार असून, ‘माहे’ श्रेणीतील दुसरी पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘मालवण’ २२ जुलै रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल केली जाणार आहे.

कारवार येथे यानिमित्ताने आयोजित समारंभास भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह प्रमुख पाहुणे म्हणून तर पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख उपॲडमिरल संजय वात्सायन यांच्यासह नौदलातील वरिष्ठ अधिकारी, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, माजी नौदल अधिकारी आणि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहतील.

‘मालवण’ ही युद्धनौका कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे पूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधली आहे. या युद्धनौकेत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर केला असून, आधुनिक युद्धनौका बांधणी, रचना आणि तांत्रिक एकत्रिकरणातील भारताची वाढती क्षमता या नौकेमुळे अधोरेखित होत आहे. त्यामुळे ही युद्धनौका ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचे प्रभावी उदाहरण मानली जात आहे.

ही नौका आकाराने लहान असली तरी तिची कार्यक्षमता अत्यंत प्रभावी आहे. उथळ समुद्रकिनारी भागात पाणबुड्यांचा शोध घेणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि आवश्यक कारवाई करणे या दृष्टीने तिची विशेष रचना केली आहे.

जलद गती, अचूकता आणि दीर्घकाळ कार्यरत राहण्याची क्षमता ही या युद्धनौकेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. किनारी सुरक्षेला अधिक बळकटी देणे आणि समुद्रातील संवेदनशील भागांवर प्रभावी नियंत्रण राखणे, यासाठी ही युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

‘माहे’ श्रेणीतील युद्धनौकांच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या किनारी संरक्षण व्यवस्थेला अधिक आधुनिक स्वरूप प्राप्त होत आहे. या श्रेणीतील नौका स्वदेशी तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणे आणि आधुनिक युद्धतंत्राचा संगम असल्याने भविष्यातील सागरी सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची निर्मिती केली आहे.

संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ

‘मालवण’च्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या स्वदेशी युद्धनौका निर्मिती कार्यक्रमाला आणखी चालना मिळणार असून, देशाच्या सागरी संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tribal History: देवळात प्रवेश नाकारला, तर स्वतःची मंदिरे उभारली! गोव्यातील आदिवासी समाजाच्या जिद्दीची आणि अस्मितेची कहाणी

Cricketer Banned: टी-20 स्पर्धेदरम्यान कोकेनचे सेवन, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डोप टेस्टमध्ये फसला; क्रिकेट खेळणाऱ्यावर बंदी

Jharkhand Accident: झारखंडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकनं लोकांना चिरडलं; 3 महिला, 3 बालकांसह 7 जणांचा मृत्यू VIDEO

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

SCROLL FOR NEXT