Varunapuri Mangor Hill Dainik Gomanatak
गोवा

Mangor Hill: मांगोरहिल येथील 35 वर्षे रखडलेला प्रश्‍न मार्गी! नागरिकांना रस्ता देण्यास नौदल राजी; आमदार साळकरांची शिष्टाई

Varunapuri Mangor Hill: वाट नौदलाने बंद केल्याने तेथील रहिवाशी गेली तीस पस्तीस वर्षे रस्त्यासाठी झगडत होते. याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता.

Sameer Panditrao

वास्को: वरुणापुरी-मांगोरहिल येथील एका वसाहतीतील नागरिकांना आपल्या जागेतून रस्ता देण्यासाठी नौदलाने संमती दर्शविल्याने कदाचित पुढील महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. सदर प्रश्न गेले तीस पस्तीस वर्षे भिजत पडला होता.

तथापी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी याप्रकरणी पाठपुरावा करून शेवटी सुवर्णमध्य काढला. त्यामुळे तेथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. साळकर यांचे आभार मानले. नौदलाच्या जागेतून काहीजणांच्या घरांकडे व इमारतीकडे जाणारी वाट होती.

ती वाट नौदलाने बंद केल्याने तेथील रहिवाशी गेली तीस पस्तीस वर्षे रस्त्यासाठी झगडत होते. याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु यश आले नाही. त्यामुळे वाद संपुष्टात आला नव्हता. आमदार साळकर यांनी याप्रकरणी योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार त्यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. बऱ्याच चर्चेअंती शेवटी नौदल तेथून रस्ता देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास तयार झाले. लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार दाजी साळकर यांनी स्पष्ट केले.

नौदलाकडून रहिवाशांना अटी

याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. याप्रसंगी दोन्ही बाजूचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या. तेथे रस्त्यासाठी परवानगी देण्यास नौदलाने सहमती दर्शविली. तथापि सुरक्षेच्या द्दष्टीने काही अटी घातल्या आहेत. त्याचा स्वीकार तेथील रहिवाशांनी केला आहे. तेथे नौदलाच्या कुंपणालगत कोणीही आपली वाहने उभी करू नयेत, यासाठी सर्वजण राजी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT