Indian Navy Kochi To Goa Race:  Dainik Gomantak
गोवा

Navy Kochi To Goa Race: समुद्रात रंगणार कोची ते गोवा रेसचा थरार; 5 दिवसांत कापणार 667 किमी अंतर

भारतीय नौदलातर्फे आयोजन

Akshay Nirmale

Indian Navy Kochi To Goa Race: भारतीय नौदल समुद्र एक्सप्लोअर करणाऱ्या, सागरी परिक्रमा करणाऱ्या पुढील पीढीचा शोध घेत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नौदलातर्फे कोची ते गोवा या इंटर कमांड सागरी नौकायन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून खोल समुद्रात सागरी मोहिमांसाठी जाणाऱ्या जवानांचा शोधही घेतला जाणार आहे.

22 नोव्हेंबरपासून या शर्यतीला सुरवात होत आहे. इंडियन नेव्हल सेलिंग असोसिएशनतर्फे या रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत आठ महिला अधिकारी आणि अग्निवीरांसह चार संघ आणि एकूण 32 कर्मचारी सहभागी होणार आहेत.

एकूण चार संघ कोची नौदल तळापासून ते गोवा पर्यंतचे अंदाजे 667 किमीचे अंतर सुमारे पाच दिवसांत कापतील.

ओशन सेलिंग हा अत्यंत कठीण साहसी खेळ आहे. नौकानयन मोहिमेसाठी संघाची निवड करताना सागरी नौकानयनाचा पुरेसा अनुभव असलेल्या स्वयंसेवकांना प्राधान्य दिले जाते.

भारतीय नौदल या शर्यतीचा वापर साहसाची भावना जागृत करण्यासाठी आणि क्रूची जोखीम-व्यवस्थापन क्षमता वाढविण्यासाठी करते. तसेच यातून त्यांची सीमनशिप आणि तांत्रिक कौशल्यांचा गौरवही केला जातो.

नौदल अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाचे 40 फूटी चार नौदल जहाजे बुलबुल, नीलकंठ, कडलपुरा आणि हरियाल या स्पर्धेत सहभागी होती.

प्रत्येक नौकेवर नौदलाच्या तीन कमांड आणि अंदमान आणि निकोबार कमांड आणि दिल्ली येथील नौदल मुख्यालय यांच्या संयुक्त पथकातील आठ कर्मचारी असतील.

सर्वात वरिष्ठ सहभागी एक कमोडोर आहे आणि सर्वात कनिष्ठ सहभागी एक अग्निवीर असणार आहे. या शर्यतीचे पारितोषिक वितरण 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे

भारतीय नौदलाच्या मते, या लहान जहाजांवर नौकानयन करण्यातून जवानांमध्ये अमर्याद साहस आणि निसर्गाच्या घटकांबद्दल आदर निर्माण करणे हा उद्देश आहे.

नवोदित नौदल कर्मचार्‍यांमध्ये धैर्य, सौहार्द, सहनशीलता आणि एस्प्रिट-डी-कॉर्प्सची मूल्ये प्रदान करण्याचे काम यातून होईल, असा विश्वास नौदल अधिकारी व्यक्त करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT