Indian Navy Aircraft's Emergency Landing  Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे चार फ्लाईट्स वळवण्यात आल्या.

Pramod Yadav

Indian Navy Aircraft's Emergency Landing

भारतीय नौदलाच्या विमानाचे शुक्रवारी (दि. 17 मे) दुपारी दाबोळी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यामुळे सुमारे पावणे दोन तास धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. तसेच, काही फ्लाईट्सचे ऑपरेशन देखील यामुळे प्रभावित झाले.

दाबोळी गोवा विमानतळाचे संचालक एसव्हीटी धनंजय राव यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी 4.50 ते 6.30 वाजेपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.

या कालावधीत नागरी उड्डाणांसाठी धावपट्टी उपलब्ध नसल्यामुळे चार उड्डाणे इतरत्र वळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन उड्डाणे उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली, तर दुसरे विमान मुंबईकडे वळवण्यात आले.

दरम्यान, आता दाबोळी विमानतळावरील कामकाज सामान्यपणे सुरू झाले असल्याची माहिती राव यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT