Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Bicholim Volleyball League : उद्या अंतिम सामना; आकर्षक बक्षिसे स्पर्धेचे मुख्य आयोजक सम्राट स्पोर्ट्‌स पिर्ण असून, सर्वण स्पोर्ट्‌स आणि कल्चरल संघटना तसेच हळर्ण-पेडणे येथील ओम कला व सांस्कृतिक केंद्र सहआयोजक आहेत.
Bicholim Volleyball League
Bicholim Volleyball League Dainik Gomantak

Bicholim Volleyball League :

डिचोली, सर्वण-डिचोली येथे पहिल्याच राज्य पातळीवरील व्हॉलिबॉल लीग स्पर्धेला गुरुवारपासून दिमाखात सुरवात झाली आहे. रविवारी (ता.१९) या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे मुख्य आयोजक सम्राट स्पोर्ट्‌स पिर्ण असून, सर्वण स्पोर्ट्‌स आणि कल्चरल संघटना तसेच हळर्ण-पेडणे येथील ओम कला व सांस्कृतिक केंद्र सहआयोजक आहेत.

गुरुवारी (ता.१६) रात्री विशेष सोहळ्यात प्रमुख पाहुणे आमदार प्रेमेंद्र शेट आणि सन्माननीय अतिथी डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले.

Bicholim Volleyball League
Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

यावेळी सम्राट स्पोर्ट्‌सचे प्रोप्रायटर हरिश्चंद्र नाईक, अध्यक्ष रोहिदास नाईक, ओम कला केंद्राचे अध्यक्ष ॲड. मयूर परब, सर्वण क्लबचे अध्यक्ष डॉ. नवसू सावंत, पंच दिव्या नाईक, देवस्थानचे सीताराम सावंत आणि अन्य उपस्थित होते. आमदार डॉ. शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

खास आसनव्यवस्था

या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी खास स्टॅण्ड उभारून आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक संघात १९ वर्षांखालील एक स्थानिक तर राज्याबाहेरील एक राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे.

‘अ’ गटात ४ संघ आणि ‘ब’ गटात ४ संघ याप्रमाणे स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना अनुक्रमे रोख १ लाख आणि ५० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य बक्षिसेही देण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com