Ashish Nehra Dainik Gomantak
गोवा

Ashish Nehra: आशिष नेहराच्या अडचणीत वाढ; केळशी ग्रामपंचायतीने बजावली नोटीस

Manish Jadhav

मडगाव: केळशी समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्‍या आपल्‍या मालमत्तेत जाण्‍यासाठी वाळूचा पट्टा कापून बेकायदेशीर रस्‍ता तयार केल्‍याचा आरोप असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्‍या त्‍या कृतीची पंचायतीने गंभीर दखल घेतली आहे. हा वाळूचा पट्टा पुन्‍हा पूर्ववत करावा, अशा आशयाची नोटीस पंचायतीने त्‍याला पाठवली आहे. त्‍यात सदर रस्‍ता विकास प्रतिबंधित जागेतून तयार करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचे नमूद केले असून यापूर्वी पंचायतीने हे काम बंद करण्‍याचा आदेशही जारी केला होता. केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, नेहराच्‍या मालमत्तेचे पॉवर ऑफ ॲटर्नी हिमांशू जैन यांना ही नोटीस पाठवली आहे. नेहराच्‍या या बांधकामाला ग्रामस्‍थांनी विरोध केला आहे. ग्रामसभेतही विषय गाजला आहे.

झाडांची कत्तल

दरम्यान, नेहराने रस्ता तयार करण्यासाठी पंचायतीची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. त्यामुळे या प्रकरणी स्थानिकांनी पंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. हा विषय गंभीरतेने घेऊन सरपंच डिक्सन वाझ यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. हा रस्ता तयार करतेवेळी वाळूच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी आत शिरत आहे. तसेच, स्थानिकांच्या घरांना आणि त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

सरपंच डिक्सन आणि आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यात वाद!

दुसरीकडे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा विद्ध्वंस होत असतानाही सरपंच गप्प का, असा सवाल आमदार व्हिएगस यांनी केला होता. ही जमीन पूर्वस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न झाले, असा सवाल केला तर सरपंच डिक्सन वाझ यांनी हा रस्ता अवैध असल्याने काम बंदचा आदेश पंचायतीने जारी केला असे म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJI Dr. D.Y Chandrachud: आता कोकणीसह मराठीत होणार सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांचे अनुवादन; CJI चंद्रचूड यांचं गोव्यात मोठं वक्तव्य

Goa News: गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सचिवपदी निवड; वाचा दिवसभरातील घडामोडी

CJI D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं.. CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक

Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

Chief Justice Dr. D. Y. Chandrachud: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा गोवा दौरा; मेरशीतील जिल्हा व सत्र न्यायालय संकुलाचे केले उद्घाटन

SCROLL FOR NEXT