Indian Coast Guards Rescue Operation 
गोवा

क्रूझ लाइनरमध्ये प्रवाशाला अचानक सुरु झाला हृदयाचा त्रास, गोव्याच्या समुद्रात तट रक्षक दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे 80 नॉटिकल मैल अंतरावर गेलेल्या क्रूझ लाइनर कोस्टा सेरेनामधील एका भारतीय प्रवाशाला त्रास सुरु झाला.

Pramod Yadav

Indian Coast Guards Rescue Operation: गोव्याच्या किनाऱ्यापासून सुमारे 80 नॉटिकल मैल अंतरावर गेलेल्या क्रूझ लाइनर कोस्टा सेरेनामधून एका भारतीय प्रवाशाला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. ICG च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ लाइनरमध्ये दुपारी 3:20 वाजता हृदयाशी संबंधित आजाराचा त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय मदतीसाठी प्रवाशाला बाहेर आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रवाशाची तब्येत बिघडलेली असल्याने गोव्यातील ICG मरीन रेस्क्यू सब कोऑर्डिनेशन सेंटर (MRSC) ने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

क्रुझ लाइनरला मार्ग बदलून रुग्णाला वैद्यकीय मदतीसाठी जमिनीवर घेऊन येण्यासाठी गोव्याकडे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या परिसरात आधीपासूनच तैनात असलेली ICG इंटरसेप्टर बोट C-158 ताबडतोब घटनास्थळी रवाना करण्यात आली. C-158 आणि कोस्टा सेरेना गोव्यापासून सुमारे 30 नॉटिकल मैलांवर एकत्र आले.

C-158 ने क्रूझ जहाजाच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मदतीने रुग्णाला बाहेर काढण्यात आले.

रुग्णाला घेतल्यानंतर C-158 रात्री 8:30 वाजता मुरगाव बंदर प्राधिकरणात दाखल झाले, असे ICG प्रवक्त्याने सांगितले. त्यानंतर रुग्णाला ताबडतोब पणजी येथील मणिपाल रुग्णालयात विशेष वैद्यकीय उपचारासाठी स्थानांतरित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT