Goa Panchayat Elections  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: बार्देशात अपक्ष उमेदवार चमकले

बार्देशातील पंचायत निवडणुकीचा कौल हा पॅनेल किंवा पुरस्कृत उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांच्या बाजूने दिसला.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: बार्देशातील पंचायत निवडणुकीचा कौल हा पॅनेल किंवा पुरस्कृत उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांच्या बाजूने दिसला. तालुक्यातील जवळपास सर्वच पंचायतींमध्ये अपक्षांनीच बाजी मारली. याशिवाय साळगाव पंचायतीच्या एका प्रभागात दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून निकाल जाहीर करण्यात आला आहे.

(Independent candidates win in Bardesh)

बार्देश येथील पंचायत निवडणुकीची मतमोजणी संपताच तालुक्यातील अपक्ष उमेदवारांना स्पष्ट पाठिंबा मिळाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हेच अपक्ष उमेदवार येत्या काळात पंचायत मंडळ निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असेच चित्र आहे. अनेक पंचायतींमध्ये अपक्षांनी आश्चर्यचकित कामगिरी केल्याने अनपेक्षित निकाल लागले. यामध्ये कळंगुट पंचायतमधून एकूण पाच अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यामुळे आमदार मायकल लोबोंच्या पॅनेलला जबर धक्का बसला. तालुक्यात काही भागांत दांपत्यांनाही संमिश्र प्रतिसाद लाभला. मात्र, अनेकांना पराभव पत्करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT