Independence Day 2026 guidelines Dainik Gomantak
गोवा

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

Independence Day 2026 guidelines: यंदाचा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: यंदाचा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. १५ ऑगस्टच्या मुख्य कार्यक्रमासोबतच स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, देशभक्तीपर कार्यक्रम, विविध राज्यांतील सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

केंद्राच्या सूचनेनुसार राज्याची राजधानी, जिल्हा मुख्यालय, उपविभाग, ग्रामपंचायत पातळीवर स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा सकाळी ९ वाजल्यानंतर सुरू करावा. राज्यपातळीवरील कार्यक्रमात मुख्यमंत्री राष्ट्रध्वज फडकवतील. त्यानंतर राष्ट्रगीत, पोलिस, निमलष्करी दल, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना आणि स्काऊट पथकांकडून संचलन, मुख्यमंत्र्यांचे जनतेला संबोधन आणि त्यानंतर पुन्हा देशभक्तीपर गीत व राष्ट्रगीत असा कार्यक्रम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर मंत्री, आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे. त्यानंतर राष्ट्रगीत, पोलिस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना आणि स्काऊट पथकांचे संचलन तसेच जनतेला संबोधन असे कार्यक्रम असतील. उपविभाग पातळीवर संबंधित उपविभागीय अधिकारी अथवा गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि जनतेला संबोधन करण्याच्या सूचना आहेत.

‘ॲट होम’ सोहळ्यात विशेष पाहुण्यांना स्थान

राज्यपालांच्या निवासस्थानी होणाऱ्या ‘ॲट होम’ समारंभालाही यंदा वेगळे स्वरूप देण्याची सूचना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ नंतर आयोजित करता येईल. पारंपरिक शासकीय निमंत्रितांबरोबर समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यावर भर देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT