Goa School Dainik Gomantak
गोवा

Goa School: विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन : शिक्षकावर गुन्हा

Goa School: काणकोण येथील विद्यार्थी मारहाण प्रकरण सध्या गाजत असतानाच, साखळीतील एका शाळेतील शिक्षकाचा पराक्रम समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa School: काणकोण येथील विद्यार्थी मारहाण प्रकरण सध्या गाजत असतानाच, साखळीतील एका शाळेतील शिक्षकाचा पराक्रम समोर आला आहे. या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, संबंधित शिक्षक अडचणीत आला आहे. हा प्रकार साखळीतील एका नामांकित शाळेत घडला आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी या शिक्षकाने ९ सप्टेंबर रोजी वर्गखोलीत असभ्य वर्तन केले.

शिक्षकाने विद्यार्थिनीला ढकलल्याने ती जमिनीवर पडून तिच्या पायाला जखम झाली, अशी तक्रार विद्यार्थिनीच्या आईने डिचोली पोलिसांत नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आज (शनिवारी) ‘भादंसं’च्या ३४३ आणि बाल हक्क कायद्याच्या ८ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. डिचोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसाद पाळणी पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Best SUVs Under 15 Lakhs: रॉयल लूक अन् दमदार परफॉर्मन्स! 15 लाखांच्या किमतीत 'या' 5 एसयूव्ही ठरतायत ग्राहकांची पहिली पसंती

Electricity Bills Goa: वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! Video

Goa Drowning Death: मौजमजा बेतली जीवावर! पोळे बीचवर कर्नाटकातील 19 वर्षांचा तरुण बुडाला, शोध सुरू

Mumbai- konkan M2M Ferries: चाकरमान्यांना बोटीनं जाता येणार गावी! ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका; पाहा 'एम टू एम' फेरीचे वेळापत्रक

Bengaluru to Goa Vande Bharat: प्रवास सुखकर होणार! बंगळुरू ते गोवा आता फक्त 13 तासांत; रेल्वे मंत्रालयाकडून 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT