Yuri Alemao|Cuncolim Industrial Estate Goa Dainik Gomantak
गोवा

Cuncolim IDC: ..तर लोकच कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत बंद पाडतील! फिशमिल प्रदूषणावरुन आलेमाव यांचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim Fishmill Pollution

मडगाव: प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असलेली कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत आता फिशमिल प्रकल्‍पातील सांडपाण्‍यामुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी पुन्‍हा एकदा चर्चेत आली आहे.

या वसाहतीत असलेले दहा फिशमिल प्रकल्‍प आपले सांडपाणी सरळ नदीत सोडतात, असा आरोप विरोधी पक्षनेते तथा कुंकळ्‍ळीचे आमदार युरी आलेमाव (Yuri Alemao) यांनी केला असून या प्रदूषणाचा स्रोत कोणता हे जोपर्यंत स्‍पष्‍ट होत नाही, तोपर्यंत हे दहाही फिशमिल प्रकल्‍प बंद ठेवा, अशी मागणी आज त्‍यांनी केली.

कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीच्‍या जवळ असलेल्‍या पाण्‍याच्‍या स्रोतात हे सांडपाणी मिसळून दुर्गंधी सुटल्‍यामुळे आज कुंकळ्‍ळीच्‍या नागरिकांबरोबर आमदार आलेमाव आणि केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता (Altone D'Costa) यांनी औद्योगिक वसाहतीची पाहणी केली. हेच दूषित पाणी आंबावलीपर्यंत जात असल्‍याने आंबावलीचेही जलस्रोत दूषित झाले असून हे पाणी माणसांनी किंवा जनावरांनी वापरण्‍यासारखे नाही असे यावेळी आमदार डिकॉस्‍ता यांनी सांगितले.

हे प्रदूषणकारी कारखाने बंद केले नाहीत तर लोक रस्‍त्‍यावर उतरून ते बंद करतील, असा इशारा आलेमाव यांनी दिला. या प्रदूषणकारी कारखान्‍यांविरोधात कुंकळ्‍ळी पालिकेने फौजदारी तक्रार नोंदवावी, अशी सूचनाही त्यांनी कुंकळ्‍ळीचे नगराध्‍यक्ष लँड्री मास्‍कारेन्‍हस यांना दिली.

...तर लोकच उद्योग बंद पाडतील!

कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत हा सामान्‍य कुंकळ्ळीकरांसाठी एक शाप ठरलेला आहे. प्रदूषणकारी कारखान्‍यांविरोधात कारवाई करा, अशी प्रत्‍येकवेळी आमची मागणी असते. मात्र सरकार ही मागणी गंभीरतेने घेत नाही. मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना कारखानदारांकडून पैशांच्‍या बॅगा पोहचतात त्‍यामुळेच ते सर्व मूग गिळून गप्‍प आहेत, असा आरोप करून आता सरकारने कारवाई केली नाही तर लोकच ही औद्याेगिक वसाहत बंद पाडतील, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

कुंकळ्‍ळी औद्याेगिक वसाहतीत कशाप्रकारचा गैरकारभार चालू आहे हे उद्योगमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी या वसाहतीला भेट देऊन पहावे आणि या वसाहतीत प्रदूषण नाही, असे म्‍हणणाऱ्या पर्यटन मंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनीही या वसाहतीला भेट द्यावी.
युरी आलेमाव, विरोधीपक्ष नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT