Leopard in Sattari  Canva
गोवा

Leopard In Goa: सत्तरीत बिबट्याचा थरार! घराच्या अंगणात वाढला संचार; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

Sattari Leopard: सत्तरी तालुक्यात वन्य प्राणी शेती, बागायतींचे नुकसान करीत असतानाच दुसरीकडे आता बिबट्यासारखे वन्यप्राणी गावातील पाळीव प्राण्यांना भक्ष करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यात वन्य प्राणी शेती, बागायतींचे नुकसान करीत असतानाच दुसरीकडे आता बिबट्यासारखे वन्यप्राणी गावातील पाळीव प्राण्यांना भक्ष करीत आहेत. सोमवारी पहाटे मलपण येथील मनोहर जोशी यांच्या अंगणात असलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला.

कुत्रा पिंजऱ्यात असल्याने वाचला. मागील ऑक्टोंबर महिन्यात जोशी यांचा अन्य एका कुत्रा बिबट्याने ठार मारला होते. कुत्र्याला अंगणातून ओढत नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात टिपले होते. सोमवारी पहाटे पुन्हा अंगणात बिबटा फिरताना दिसून आला. जोशी यांच्या अंगणात कॅमेरे कार्यान्वित आहेत.

याबाबत मनोहर जोशी यांनी सांगितले की, एकीकडे बागायतदारांना रानटी प्राण्यांच्या आक्रमणाला सामोरे जावे लागत आहे. त्यात खेती, माकड, गवेरेडे, मोर, शेकरे असे वन्य प्राणी बागायती पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी करीत आहे. आता बिबटेसारखे वन्यप्राणी गावात येऊन पाळीव प्राण्यांना भक्ष्य बनवित आहे. त्यामुळे बागायतदार दोन्ही बाजूंनी संकटातून जात आहे. बिबट्यामुळे लोकांना बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. जंगलातील बिबट्यांचे अन्न संपल्याने गावाकडे बिबट्यांनी मोर्चा वळविला आहे. यात मनुष्यहानी देखील होण्याची संभावना आहे. बिबट्या गावात येणार नाही यासाठी वन खात्याने कारवाई करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करावा, कॅश फॉर जॉब प्रकरणी आमदार व्हेंझी यांचं आवाहान

Goa Diabetes Epidemic: धक्कादायक! राज्यात दर चौघांमागे एकाला मधुमेह; 26.4 टक्क्यांहून अधिक गोमंतकीयांना आजाराची लागण

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी 'दीपाश्री'ला कोर्टाचा झटका; सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

Goa Crime: एकाच दिवशी 2 रशियन नागरिकांचा गोव्यात मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरु

Goa Agriculture: गोव्यात मिरी लागवड क्षेत्रात वाढ! 350 टन उत्पादन; 868 हेक्टर क्षेत्रफळात लागवड

SCROLL FOR NEXT