Drug Case  Gomantak Digital Team
गोवा

Goa Drugs Case: राज्यात ड्रग्‍जसंबंधित गुन्ह्यांत वाढ, विद्यार्थी- स्‍थानिक युवक टार्गेट

चिंताजनक : कोरोनानंतर खुल्‍या झालेल्‍या पर्यटन व्‍यवसायाची काळी बाजू उघड

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case कोरोनाच्‍या लाटेत गोव्‍यात पर्यटन क्षेत्रात आलेली मंदी आता स्‍थिरस्‍थावर होत आहे. ही जरी व्‍यावसायिकांच्‍या दृष्‍टीने चांगली गोष्‍ट असली तरी दुसऱ्या बाजूने गोव्‍यात ड्रग्‍जसंबंधित गुन्‍हेही वाढू लागले आहेत.

मागच्‍या वर्षीच्‍या तुलनेत यावेळी अशाप्रकारच्‍या गुन्‍ह्यांत 90 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असून अटक केलेल्‍यांच्‍या संख्‍येतही 82 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली दिसत असल्याने ही एक चिंताजनक बाब बनली आहे.

आतापर्यंत केवळ किनारपट्टी क्षेत्रातच हा ड्रग्‍ज व्‍यवसाय चालू होता. मात्र, आता ही गुन्‍हेगारी गोव्‍यातील इतर भागातही पोहोचलेली आहे.

फोंडा आणि कुडचडे ही अशा गुन्‍हेगारीची दोन नवीन केंद्रे तयार झाली असून फाेंडा भागात औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार तर कुडचडे भागात विद्यार्थी व स्‍थानिक युवकांना हे गुन्‍हेगार टार्गेट करत आहेत. स्‍थानिक युवकांनाही या व्यवसायात गुंतवले जात आहे.

स्‍थानिक युवकही ड्रग्ज व्यवसायात : 23 मे रोजी फर्मागुढी-फाेंडा येथे पोलिसांनी दोन राजस्‍थानी युवकांना अटक करून त्‍यांच्‍याकडून 14.50 लाखांचे अमलीपदार्थ जप्‍त केले होते. त्‍यापूर्वी 18 मे रोजी कुडचडे पोलिसांनी युनूस माताजी या 22 वर्षीय युवकाला अटक करून त्‍याच्‍याकडून 80 हजार रुपयांचा गांजा जप्‍त केला होता.

या व्‍यवसायात पूर्वी विदेशी नागरिक आणि बिगर गोमंतकीयांचा समावेश होता. मात्र, आता या व्‍यवसायात स्‍थानिक युवकही उतरले आहेत.

गांजाचे प्रमाण अधिक

गोव्‍यात सध्‍या सर्रास विकला जात असलेल्‍या अमली पदार्थांमध्‍ये गांजाचे प्रमाण अधिक आहे. या पहिल्‍या चार महिन्‍यांत पोलिसांनी एकूण 67 किलो अमली पदार्थ जप्‍त केला होता.

त्‍यातील 62 किलो हा फक्‍त गांजा असून सुमारे तीन किलो चरस आणि इतर दोन किलो सिंथेटिक्‍स ड्रग्‍ज आहेत. या चार महिन्‍यांत गोव्‍याच्‍या अमली पदार्थविरोधी पथकाने 15 गुन्‍ह्यांची नोंद केली आहे. यापाठोपाठ कळंगुट पोलिसांनी 8 तर अंजुणा पोलिसांनी 7 गुन्‍ह्यांनी नोंद केली आहे.

गोवा पोलिसांनी आतापर्यंत जी कारवाई केली आहे ती फक्‍त डोळ्यांना पाणी लावण्‍यापुरतीच मर्यादित आहे. वास्‍तविक याच्‍या कित्‍येक अधिक पटीने हा व्‍यवसाय गोव्‍यात चालतो.

काही राजकारण्‍यांचा या व्‍यावसायिकांना आशीर्वाद असल्‍यामुळे गोव्‍यात खुलेआम हा व्‍यवसाय चालू आहे. त्‍यामुळे गोवा ही ड्रग्‍स तस्‍करीची राजधानी बनली आहे, असे म्‍हटल्‍यास ते अतिशयोक्‍तीचे ठरू नये. या व्‍यवसायाविरोधात गोवा फॉरवर्डने कित्‍येकदा आवाज उठविला आहे.

- दुर्गादास कामत, सरचिटणीस, गोवा फाॅरवर्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT