Goa Marine Police:
Goa Marine Police:Dainik Gomantak

Goa Marine Police: गोवा पोलिसांना तटरक्षक दलाकडून प्रशिक्षण; सागरी कौशल्यांची दिली माहिती

पोलिसांनी कोस्ट गार्डच्या जहाजावर घेतला अनुभव
Published on

Coast Guard gives training to Goa Marine Police: राज्याच्या किनारी संरक्षणात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात, भारतीय तटरक्षक दलातर्फे गोवा पोलिसांच्या सागरी विभागाला प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.

यामध्ये गोवा पोलीस कर्मचार्‍यांना सागरी कौशल्ये, किनारपट्टीवरील ऑपरेशन्सचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच समुद्रातील कोस्ट गार्ड जहाजांवर नेऊनही त्यांना माहिती देण्यात आली.

Goa Marine Police:
Mahadayi Water Dispute: अखेर ‘म्हादई-प्रवाह’ अधिसूचित; पणजीत असणार कार्यालय, जाणून घ्या कसे असेल प्राधिकरण?

22 मे रोजी या प्रशिक्षणाची सुरवात झाली होती. या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमात किनारपट्टी सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

तटरक्षक दलाने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गोव्यातील विविध किनारी सुरक्षा पोलीस ठाण्यांतील पंधरा सागरी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

त्यांचे सागरी कौशल्य वाढवणे, त्यांना किनारपट्टीवरील ऑपरेशन्सची ओळख करून देणे आणि भारतीय तटरक्षक दल आणि सागरी पोलिस यांच्यातील ऑपरेशनल समन्वय विकसित करणे हा यामागचा उद्देश होता.”

“प्रशिक्षणात प्रात्यक्षिक ऑन-बोर्ड प्रशिक्षण आणि वर्ग सत्रे यांचा समावेश होता. सहभागींनी कोस्ट गार्ड इंटरसेप्टर बोटींवर प्रशिक्षण घेतले. यातून त्यांना समुद्री कौशल्यांचा मोठा अनुभव मिळाला आहे. तसेच किनारपट्टी आणि बेटांशी त्यांचा चांगला परिचय झाला.

Goa Marine Police:
Goa AAP: आम आदमी पार्टीची गोवा कार्यकारिणी बरखास्त; अमित पालेकर प्रदेशाध्यक्षपदी कायम

वर्गातील सत्रांमध्ये बोर्डिंग ऑपरेशन्स, रेडिओ ऑपरेटिंग प्रक्रिया, सीमॅनशिप, अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण यासारख्या आवश्यक विषयांचा समावेश होता.

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सागरी पोलिस कर्मचाऱ्यांना सागरी ऑपरेशन्सची सखोल माहिती मिळाली, असे तटरक्षक दलाने सांगितले आहे. कोस्ट गार्डला गोवा पोलिस यांच्या समन्वयातून राज्याच्या किनारपट्टीची सुरक्षा आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com