Inconvenience to school children due to lack of bus facilities in the Sanquelim valpoi area Dainik Gomantak
गोवा

साखळी, वाळपई भागात बस अभावी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय

संतप्त नागरिकांचा रस्ता रोको करण्याचा इशारा

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : पर्ये मतदार संघात येणाऱ्या भिंरोडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या विविध भागातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना बस वाहतूकीची व्यवस्था नसल्याने गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाचा खोळंबा होत असून अनियमित बस वाहतूकीमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी सरकारने तोडगा न काढल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवता रस्ता रोको केला जाईल असा इशारा दिला आहे.

या संबंधी सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून या भागातून ये-जा करणाऱ्या कदंबा बसेस बंद झाल्या आहेत, त्यामुळे साखळी, (sanquelim) वाळपई तसेच इतर भागांत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर (Student) फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे बाजारहाट करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना तसेच नोकरी साठी जाणाऱ्या नोकरीदार वर्गाला याचा फटका बसत आहेत. या भागात बस व्यवस्था नसल्याने कधी कधी विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचत नाहीत, तर काही वेळा पालकांना आपला कामधंदा सोडून मुलांना शाळेत ने आण करण्याकरिता जावे लागत आहे.

या भागातील वाहतूक (Transportation) व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी बऱ्याच वेळा करून सुद्धा सरकार या प्रकरणी कोणताच तोडगा काढत नाही, त्यामुळे पालक संताप व्यक्त करत आहेत. त्याच बरोबर या भागातील काही मार्गांवर खाजगी बसेस सुरू केल्या होत्या, परंतू त्या बसने वाहतूक खात्याकडून मार्ग घेतले आहेत, पण गावातून ये जा न करता अर्ध्या मार्गातून वाहतूक करतात, याची चौकशी वाहतूक खात्याने करावी. त्याच प्रमाणे या भागातील वाहतूक समस्येची दखल घेऊन तातडीने हा विषय संपुष्टात आणावा. अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन रास्ता रोको करण्याचा पर्याय निवडावा लागेल असा इशारा भिरोंडा पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्यास याचा फायदा शिंगणे, वाघुरे, पणसे, पिसुर्ले या ठिकाणाचा नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना होणार आहे, त्यामुळे हा विषय त्वरित मार्गी लावण्याची अत्यंत गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT