tree cutting Dainik Gomantak
गोवा

Kudka News: पंचायतीनेच केली वृक्षतोड; फांद्या कापण्याच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार

Illegal Cutting Of Trees: कुडका पंचायतीची आगळीक; खासगी जमिनीतील वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने उपटून काढण्याचा प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

कुडका येथील उतरणीवर खासगी जमिनीतील वृक्ष जेसीबीच्या साहाय्याने उपटून काढण्याचा प्रकार घडला असून येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. आश्चर्याची गोष्टी म्हणजे, ही वृक्षतोड कुडका-बांबोळी-तळावली पंचायतीनेच केली आहे.

मुख्य जिल्हा रस्त्यांच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याच्या नावाखाली हा बेकायदेशीर प्रकार घडला असल्याचा आरोप शेतकरी मंगेश कुर्टीकर यांनी केला आहे. कुडका-मेरशी मुख्य जिल्हा रस्ता असून येथील झाडेझुडपे आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याद्वारे केले जाते; परंतु येथे पंचायतीला अधिकार नसतानाही हा बेकायदेशीर प्रकार केला असल्याचा दावा कुर्टीकर यांनी केला आहे.

हा वृक्ष मुळासकट उपटून काढण्यात आला. त्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करण्यात आला. आमच्या खासगी जमिनीत शिरून मोडतोड करण्यात आली. यामुळे आमचे सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित जेसीबीमालक आणि पंचायतीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे, तसेच याप्रकरणी वन खाते आणि तिसवाडी मामलेदारांकडे तक्रार नोंदवणार असल्याची माहिती मंगेश कुर्टीकर यांनी दिली.

संबंधितांवर गुन्हा नोंदविणार

कुडका येथे बेकायदा वृक्षतोड केल्याची तक्रार मंगेश कुर्टीकर यांनी केली आहे.आम्ही येथे डोंगरावर काजू-भाजीपाल्याची लागवड केली आहे. वास्तविक आमची परवानगी न घेता हे काम करण्यात आले. हे काम करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता, याचा जाब पंचायतीला विचार आहोत. यासंबंधी आगशी पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्याचे नमूद केले आहे, असे कुर्टीकर यांनी सांगितले.

वाहतुकीस अडथळा करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापल्या आहेत. कारण २८ जुलै रोजी सांतान येथे तवशाचे फेस्त होणार असून चर्चच्या फादरनी आम्हाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यालगतच्या फांद्या कापण्याची विनंती केली होती. तसेच पंचायत मंडळाने ठराव संमत करून हे काम केले आहे.
डियोना कोरगावकर, सरपंच, कुडका-बांबोळ-तळावली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT