Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दोना पावला येथे तरुणीचा विनयभंग, झारखंडला जाण्याच्या तयारीत असलेल्या कॅसिनो कर्मचाऱ्यास अटक, CCTV मुळे काढला माग

Dona Paula Crime Incident: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोना पावला येथील ‘हवाई बीच’ येथे राहत असलेली तरुणी काही दिवसांपूर्वी संध्याकाळच्यावेळी रस्त्यावरून चालत होती.

Sameer Panditrao

पणजी: दोना पावला येथील रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी चालत जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने रेल्वेने पसार होण्याच्या तयारी असताना कॅसिनोचा कर्मचारी संशयित अमरित बल्ला (२४, झारखंड) याला अटक केली. त्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोना पावला येथील ‘हवाई बीच’ येथे राहत असलेली तरुणी काही दिवसांपूर्वी संध्याकाळच्यावेळी रस्त्यावरून चालत होती. त्यावेळी समोरून आलेल्या अनोळखी तरुणाने तिला घट्ट पकडले. तिने आरडाओरड केली असता तो तरुण तेथून पळाला. या घटनेची तक्रार तरुणीने पणजी पोलिसांत दिली होती.

पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन येथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या अनोळखी तरुणाची माहिती मिळवून ओळख पटवण्यासाठी त्या भागातील काही आस्थापनांमध्ये तसेच आजुबाजूला सुरू केलेल्या बांधकामाच्या ठिकाणी चौकशी केली. अखेर या अनोखळी तरुणाची ओळख पटली. तो दोना पावला येथील प्रसिद्ध कॅसिनोमध्ये कर्मचारी होता व तो तेथेच राहत होता.

चौकशीनंतर पलायनाचा डाव उघड

पोलिसांनी हॉटेलातील कॅसिनोमध्ये कामाला असलेल्या व संशयित अमरित बल्ला याच्यासोबत राहत असलेल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली असता तो मडगाव येथून रेल्वेने झारखंड येथे जाण्यास निघाला असल्याची माहिती मिळताच पणजी पोलिस पथक मडगावला रवाना झाले. तो झारखंडला जाणाऱ्या रेल्वेसाठी प्लॅटफॉर्मवर थांबला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून पोलिस तपास करत आहेत. त्याची दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडित तरुणीमार्फत ओळखपरेड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT