Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Para Swimming Championships: चांगल्या क्रीडा सुविधांसाठी 'गोवा' कटीबद्ध! 'पॅरा जलतरण' स्पर्धेवेळी फळदेसाईंचे आश्वासन

Goa government sports commitment: क्रीडा क्षेत्रात आता गोव्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. राज्य सरकार राष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांसाठी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रविवारी केले. ते २४व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

24th National Para Swimming Championships 2024 At Goa Campal

पणजी: क्रीडा क्षेत्रात आता गोव्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. राज्य सरकार राष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांसाठी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रविवारी केले. ते २४व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी बोलत होते.

कांपाल येथील जलतरण तलावात रविवारपासून स्पर्धेला सुरवात झाली. दिव्यांगांच्या या जलतरण स्पर्धेत देशभरातील स्पर्धक विक्रमी संख्येने (५१८) सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध गटात २२ शर्यती झाल्या.

गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांच्यातर्फे राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण खाते यांच्या सहयोगाने आणि भारतीय पॅरालिंपिक समिती व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने राज्यात प्रथमच पॅरा जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्‍घाटन सोहळ्यास मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह क्रीडामंत्री गोविंद गावडे, राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण सचिव ई. वल्लावन, मडगावचे आमदार दिगंबर कामत, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, क्रीडा संचालक अरविंद खुटकर, राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याच्या संचालक वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाझिक, भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया, सचिव जयवंत, व्ही. के. दबास यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT