Goa News
Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोमन्तक ‘तनिष्का व्यासपीठ’तर्फे ‘पुरूमेंत फेस्त’

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News मे महिना सुरू होताच गोमंतकीय महिला ज्याची आतुरतेने वाट बघतात, त्या ‘पुरूमेंत फेस्त’चे आयोजन ‘गोमन्तक तनिष्का व्यासपीठ’च्या माध्यमातून पणजीत करण्यात आले आहे.

१२ आणि 13 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत पणजी-कांपाल भागातील सेंट ओरिआसो गार्डनमध्ये हे ‘पुरूमेंत फेस्त’ होणार आहे.

पुरूमेंतसाठी मे महिना एकदम उत्तम असतो. या दिवसात मुद्दाम वर्षभरासाठी लागणारी कडधान्ये, मिरची, आंबटाण, खारे (सुकवलेले) मासे, भिण्णांची सोलं (कोकम) इत्यादींची खरेदी केली जाते.

गोव्यात ‘पुरूमेंत’ची मोठी परंपरा आहे. घराघरांतील गृहिणी सध्या याच कामात व्यस्त असतात. पुरूमेंतचे महत्त्व लक्षात घेऊन आणि संपूर्ण गोव्यातील पुरुमेंताचे प्रसिद्ध असे सर्व प्रकार एकाच ठिकाणी मिळावेत म्हणून ‘तनिष्का व्यासपीठ’ने या फेस्ताचे आयोजन केले आहे.

याशिवाय 12-13 मे रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होणार आहेत.

विविध पदार्थांचा समावेश : दोन दिवसांच्या या फेस्तामध्ये पेडणे ते काणकोणपर्यंतच्या ‘तनिष्का व्यासपीठ’मधील महिला पुरूमेंतचे स्टॉल लावणार आहेत. ‘तनिष्का व्यासपीठ’च्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या महिला गटांचा यात सहभाग असल्यामुळे त्यांनी बनवलेल्या विविध पदार्थांचा यात समावेश असेल.

फेस्ताचे मुख्य आकर्षण

गोमंतकीय हुमणासाठी वापरण्यात येणारी पेडणे-हरमल, काणकोणची प्रसिद्ध मिरची, साळचे अळसांदे, फोंडा-केरी (सत्तरी) भागातील मिरी, उकडे तांदूळ, खोबरेल तेल, सेंद्रिय पद्धतीने बनवला जाणारा खोतिगावचा गूळ आणि काकवी, आमटाणाची सोले, डिचोली - मयेमधल्या काजू बिया, सोलं (भिण्णा), फणसाचे तळलेले गरे, शेवया, खळांतली तोरं, नाचणी, गरम मसाला, पापड-सांडगे, लोणचे, फुलांच्या फाती यासारख्या मोजदाद नाही, अशा असंख्य गोष्टी या पुरूमेंत फेस्तचे मुख्य आकर्षण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT