Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

BJP Government: देशात आगामी काळात भाजपचेच सरकार; दिगंबर कामत

BJP Government: दक्षिण गोव्यात तीन राज्यांतील विजयाचा आनंद साजरा

दैनिक गोमन्तक

BJP Government: लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चारपैकी तीन राज्यांत भाजपने सरशी घेतल्यानंतर आज मडगाव येथील दक्षिण गोवा कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

देशात पुन्हा भाजपचेच सरकार येणार याचे हे स्पष्ट संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

आजचे निकाल म्हणजे देशातील जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर दाखविलेला विश्वास असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप तीनशेचा आकडा सहज पार करेल, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला.

यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी आमदार दामू नाईक, दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक, सर्वानंद भगत, सावियो रॉड्रिग्ज तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, 4 पैकी तीन राज्यांत भाजपने मिळविलेला दणदणीत विजय म्हणजे देशाच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर दाखविलेला विश्वास आहे, असे एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT