Women's Cricket Tournament Dainik Gomantak
गोवा

Women's Cricket Tournament: अंतिम लढतीत डीएम्स महाविद्यालयाला अजिंक्यपद, पूर्वा भाईडकर ठरली विजयाची शिल्पकार

महिला क्रिकेट: डॉन बॉस्को महाविद्यालयावर दणदणीत विजय

गोमन्तक डिजिटल टीम

Women's Cricket Tournament आसगावच्या डीएम्स महाविद्यालयाने एकतर्फी अंतिम लढतीत पणजीच्या डॉन बॉस्को महाविद्यालयावर तब्बल 130 धावांनी दणदणीत विजय नोंदवत आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले.

गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना सोमवारी ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाला.

शानदार शतक ठोकणारी पूर्वा भाईडकर डीएम्सच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने 73 चेंडूंत आक्रमक 123 धावा केल्या.

त्यामुळे डीएम्सने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 226 धावा केल्या. डॉन बॉस्को महाविद्यालयास आव्हान अजिबात पेलवले नाही. त्यांना निर्धारित 20 षटकांत 6 बाद 96 धावाच करता आल्या.

धेंपे महाविद्यालयाच्या प्राचार्य वृंदा बोरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. स्पर्धेत राज्यातील 14 महाविद्यालयीन संघांनी भाग घेतला होता.

संक्षिप्त धावफलक

डीएम्स महाविद्यालय: 20 षटकांत 4 बाद 226 (पूर्वा भाईडकर 123, मेताली गवंडर 21, अर्पिता सावंत 2-30, अनीक्षा मोरजकर 2-46) विजयी विरुद्ध डॉन बॉस्को महाविद्यालय: 20 षटकांत 6 बाद 96 (अनिता चौधरी 29, सोनम म्हाळसेकर 10, मेताली गवंडर 3-16, रिदा शेख 1-20).

वैयक्तिक बक्षिसे:

उत्कृष्ट बॅटर- पूर्वा भाईडकर (डीएम्स),

उत्कृष्ट बॉलर: अमिशा लोटलीकर (डॉन बॉस्को),

स्पर्धेची मानकरी: मेताली गवंडर (डीएम्स).

विजेता डीएम्स महाविद्यालय संघ: निकित नाईक, समीक्षा राऊळ, रेश्मा राठोड, लक्ष्मी चव्हाण, पूर्वजा राठोड, ऊर्वशी गोवेकर, पूर्वा भाईडकर, रोशनी परब मयेकर, मेताली गवंडर, सावित्रीकुमारी कुमावत, संजना मालवणकर, श्रीलेखा याडला, रिदा शेख.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

SCROLL FOR NEXT