Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: शिरगावात लोकवस्तीजवळ आगीचे थैमान; लोकांत भीती

डिचोलीत पुन्हा चार ठिकाणी आगीच्या घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa: डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा चार ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. शिरगाव येथे तर भर लोकवस्तीजवळ आग पेटल्याने लोकांमध्ये हाहाकार माजला.

तर आज विविध ठिकाणी लागलेल्या आगीत काजूची झाडे जळाल्याने दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

डिचोली अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव, वाठादेव, नानोडा आणि वडावल येथे मिळून चार ठिकाणी आग लागली.

या आगीत वडावल आणि नानोडा येथे काजूची झाडे जळाल्याने काजू बागायतदारांचे 1.75 लाख रुपयांचे नुकसान झाले.

खाण परिसरात वणवा ; वेळीच नियंत्रण

शिरगाव येथे पंचायत कार्यालयाच्या मागच्या बाजूने खाण परिसरात आग लागली. लोकवस्तीजवळच वणवा पेटल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. मात्र, डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच धाव घेऊन आग नियंत्रणात आणल्याने धोका टळला.

दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायर फायटर आर.आर. परब आणि पी.जी. देसाई यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या ठिकाणी मदतकार्य करून आग नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT