Goa Agriculture | Marigold Dainik Gomantak
गोवा

Marigold In Sattari: सत्तरी तालुका ‘झेंडूमय’; दिवाळीत 1 टन फुलांची विक्री

10 हेक्टर क्षेत्रात लागवड, मोठ्या दिवाळीसाठीही उत्पादक सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

(Marigold In Sattari) वाळपई; सपना सामंत : सत्तरी तालुक्यात गेल्‍या काही वर्षांपासून झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्‍यात येत असून त्‍यास चांगली मागणीही आहे. दिवाळीपर्यंत तब्‍बल एक टन फुलांची विक्री करण्यात आली आहे. कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेअंतर्गत सत्तरीत 10 हेक्टर क्षेत्रात झेंडू फुलांची लागवड करण्यात आली असून ही रंगेबिरंगी फुले आकर्षण ठरत आहेत. सध्‍या बाजारात दीडशे रुपये प्रतिकिलो दराने ही फुले विकली जात आहेत.

वाळपई कृषी कार्यालयाने झेंडू फुलांच्या लागवडीला प्राधान्‍य आणि सहकार्य दिले असून उत्‍पादकांना आर्थिक उलाढालीची संधी प्राप्त करून दिली आहे. मात्र यंदा दिवाळीपूर्वी पडलेल्‍या जोरदार पावसामुळे उत्पादन यंदा तसे कमीच झाले. मात्र आता दिवाळीनंतर तालुक्‍यात सर्वत्र झेंडूची फुले दिसू लागली आहेत. त्‍यामुळे उत्‍पादकांच्‍या चेहऱ्यावर समाधान पसरलेले दिसून येतेय. सहा महिन्यांपासून घेतलेली त्‍यांची मेहनत कामी आली आहे.

झेंडूच्‍या फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्‍यात यावी यासाठी सत्तरी तालुक्‍यात वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका घेऊन महिला मंडळे व स्वयंसाहाय्य गटांना मार्गदर्शन करण्‍यात आले. तसेच सहकार्यही देण्‍यात आले. कृषी खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही लागवड यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्‍न करण्‍यात आले.

त्‍यामुळेच गोवा मुक्तिनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पुष्पशेती निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यामुळे वाळपई विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कौतुकाची थाप पडत आहे. जवळपास 14 जणाीनी यंदा झेंडूच्‍या फुलांची लागवड केलेली आहे. आता थंडी सुरू झाल्‍याने झेंडूच्‍या फुलांसाठी ती फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे सध्‍या सत्तरी तालुका झेंडूमय झाल्‍याचे दिसून येत आहे.

दसऱ्या, दिवाळीला मोठी मागणी

राज्‍यात दसरा व दिवाळीला मोठ्या प्रमाणात फुलांची गरज भासत असते. त्‍यामुळे शेजारच्‍या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून फुलांची आयात करावी लागते. वास्‍तविक ही फुले पंधरा दिवसांपूर्वीच तोडलेली असतात. परिणामी गोवेकरांना ताजी फुले मिळत नाहीत आणि उत्‍सवाच्‍या दिवसांत फुलांचा दर वाढतो. त्‍यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसते. गोवा सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘स्वयंपूर्ण गोवा’च्या माध्यमातून नागरिकांना या प्रवाहात सामील करून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. याच अनुषंगाने ‘आत्मा’ योजनेअंतर्गत वाळपई विभागीय कृषी कार्यालयाने भर देऊन झेंडू फुलांची लागवड करण्याचा प्रयोग हाती घेतला व तो यशस्‍वीही करून दाखविला. गेल्या वर्षी सत्तरीत दोन टन फुलांची लागवड झाली होती.

महिला मंडळे व स्वयंसाहाय्‍य गटांना ‘आत्मा’ योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात झेंडूची रोपे उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे त्यांना लागवड करण्याचे शास्त्र व फुलांचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. लागवडीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर या फुलांची लागवड यशस्वी झाली. आता काही दिवसांनी तुळशी विवाह अर्थात ‘मोठी दिवाळी’ येणार आहे. सत्तरीतील लोकांनी स्थानिकांकडूनच फुले खरेदी करावीत, जेणेकरून त्‍यांना प्रोत्साहन मिळेल व चांगली बाजारपेठही मिळेल.

- विश्वनाथ गावस, वाळपई कृषी अधिकारी

वाळपई कृषी खात्‍याचे चांगले सहकार्य मिळाल्‍यामुळे यंदा झेंडू फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्‍यात आली. दिवाळीच्‍या आदल्‍या दिवशी मी 80 किलो फुले विकली. आमच्‍यासारख्‍या लहान उत्‍पादकांना बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने विशेष योजना राबविली पाहिजे. तसेच बाजारात स्थानिक विक्रेत्‍यांना प्रथम प्राधान्‍य द्यावे. त्‍यामुळे फुलांना चांगला दर मिळू शकेल. ही फुले पूर्णपणे ताजी व टवटवीत असतात. त्यामुळे स्‍थानिकांनी खरेदी करताना या फुलांना प्राधान्‍य द्यावे.

- उदयसिंग राणे, उत्पादक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

SCROLL FOR NEXT