Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात कोणतीही भाषा बोलू शकता, मी कन्नडही बोलतो'; मंत्री विश्वजीत राणेंची हिंदी मुलाखत Watch

Vishwajit Rane Interview: राज्यातील लोक माझ्याकडे देखील एका अपेक्षेने पाहतात. प्रतापसिंह यांचा मुलगा म्हणून लोक मला निवडून देत नाहीत; विश्वजीत राणे.

Pramod Yadav

पणजी: "गोव्यात कसालाही भाषावाद नाही. येथे हिंदी, कन्नडसह कोणतीही भाषा बोलू शकता. मी ही कन्नड बोलतो, माझी आई कन्नड आहे," असे सांगत मंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील भाषेतील तरलता अधोरेखित केली. राणे यांनी महाराष्ट्रातील भाषावादावर बोलण्यास नकार दिला.

विश्वजीत राणे एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. “पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि कामांकडे पाहून मी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्य आणि केंद्रात एकच सरकार असेल तर त्याचा फायदा होतो. भाजप आणि काँग्रेसमध्ये शिस्तीचा मोठा फरक आहे,” असे राणे म्हणाले.

“गोमेकॉत घडलेला प्रकार कदाचित योग्य नव्हता पण ज्येष्ठ नागरिकांना वेळेत उपचार मिळायला हवेत असा माझा आग्रह असतो. त्या दिवशी ओपीडी बंद होती, त्यामुळे त्या वृद्ध महिलेला आपत्कालिन विभागाशिवाय दुसरीकडे जाण्याचा पर्याय नव्हता,” असे राणे यांनी गोमेकॉतील घटनेवर स्पष्टीकरण दिले.

“सत्ता ही काडीपेटीतल्या काडीसारखी आहे. काडी पूर्ण जळेल का आर्धी याची तुम्हाला कल्पना नाही. या वास्तवाचे भान ठेऊन नेत्यांने नेहमी जमिनीवर राहून गरिबांची सेवा करायला हवी. मुख्यमंत्रीपदाच्या खूर्ची मागे मी धावत नाही तसेच, प्रमोद सावंत यांच्याशी कोणताही वाद नाही,” असे मत राज्याचे आरोग्य आणि वनमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.

“पर्यटकांचा गोव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पार्टीच्या पलिकडे बदलत आहे. येथील हिंटरलँड, धार्मिक पर्यटन पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” असे राणे म्हणाले.

राज्यातील वाहतूक समस्येवर बोलताना मुख्यमंत्री सावंत कार्यक्षम असून ते लवकरच त्यावर तोडगा काढतील असे उत्तर दिले.

वडील प्रतापसिंह राणे यांच्याबाबत बोलताना त्यांनी त्यांचा वारसा खूप मोठा असल्याचे सांगितले. प्रतापसिंह राणे यांनी २१ वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले. दयानंद बांदोडकरांनी घरी येऊन त्यांना तुमच्या सारख्या उच्च शिक्षित लोकांची राजकारणात गरज आहे असं सांगितल्याची आठवण विश्वाजीत राणे यांनी सांगितली.

राज्यातील लोक माझ्याकडे देखील एका अपेक्षेने पाहतात. प्रतापसिंह यांचा मुलगा म्हणून लोक मला निवडून देत नाहीत. एखादी टर्म तसे होऊ शकते पण, पाचवेळा तसे होणार नाही. लोक तुमचे कामच पाहतात, असे राणे म्हणाले. विश्वजीत राणे यांनी बॅटमिंटनमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केल्याचेही मुलाखतीत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT