In Goa, a fine of Rs 4 lakh was collected in a single day Dainik Gomantak
गोवा

गोव्यात एकाच दिवसात तब्बल चार लाखांचा दंड जमा

640 चालकांवर बडगा: सुधारित नियमांनुसार वाहतूक पोलिस अधिक सक्रिय

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आजपासून सुधारित मोटार वाहन कायद्याच्या नियमांची अंमलबजावणी धडाक्यात करण्यात आली. राज्यातील विविध रस्त्यांवर वाहतूक पोलिस सक्रिय झालेले दिसून आले. मात्र, दंडाची रक्कम वाढ झाल्याने वाहन चालकही सतर्क झाले. तरीही दिवसभरात वाहतूक पोलिसांनी सुमारे 640 वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आणि सुमारे 4 लाखांची दंडात्मक रक्कम जमा केली.

आज नवीन नियमांनुसार कारवाई करण्याचा पहिलाच दिवस असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही. वाहनांची कागदपत्रे तपासणीची प्रक्रियाही येत्या काही दिवसांत सुरू केली जाईल. वाहन विमा, प्रदूषणमुक्त प्रमाणपत्र याचीही तपासणी केली जाईल. वाहनचालकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यासाठीच केंद्र सरकारने चालकांच्या खिशाला कात्री लावली आहे.

चालकांनी नियमांचे पालन करावे आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले. मेरशी जंक्शनजवळ नेहमीच वाहतूक पोलिस असतात.मात्र या ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक पोलिस कर्मचारी होती. पोलिसांकडून जास्त करून दुचाकी वाहनांची तपासणी केली जात होती. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दंड ठोठावला.

प्रदूषण प्रमाणपत्रासाठी झुंबडप्रदूषण प्रमाणपत्र नसल्यासही कारवाई होऊ शकते व दंडात्मक रक्कम अधिक असल्याने गेले कित्येक महिने हे प्रमाणपत्र नसलेल्या वाहनचालकांनी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बरीच गर्दी केली होती.वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज नव्या नियमांनुसार कारवाई करताना हेल्मेट, सीट बेल्ट, दुचाकीवर दोनपेक्षा अधिक स्वार, भरधाव वेग तसेच मोबाईलवर बोलणाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले होते.

धाबे दणाणले

हेल्मेट व सीट बेल्ट नसल्यास अता 1 हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याने हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या आज नगण्य होती. वाढीव दंडाची रक्कम मशीनमध्ये नमूद केलेली असल्याने दंड भरताना वाहनचालकांची भंबेरी उडाली. नवीन नियम लागू झाल्याचे काहीजणांना माहीतही नव्हते.

नव्या नियमांच्या अंमलबजावणीचा आज पहिला दिवस होता. त्यामुळे वाहनचालकांना आज केवळ दंडाची माहिती दिली. वाहतूक नियमांचे पालन करा आणि दंडात्मक कारवाईपासून दूर राहा.

- शेखर प्रभुदेसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT