Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa Election: पक्षांतर करण्याचे धाडस यावेळी आमदारांना अशक्य

दिगंबर कामत: लोकच शिकवतील पक्षबदलूंना धडा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यभरातून मिळणाऱ्या माहितीनुसार आगामी सरकार हे काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीचेच असणार आहे. सध्याचे वातावरण पाहिल्यास कोणीही उमेदवार पक्षांतर करण्याचे धाडस करणार नाही. पक्षांतर केलेल्यांविरोधात मतदारांनी मते दिली आहेत. त्यामुळे निवडून येऊन पक्षांतर केल्यास लोक त्यांना योग्य धडा शिकवतील, असा दावा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला.

येत्या 10 मार्चला मतमोजणी झाल्यानंतर साधारण 15 मार्चपर्यंत गोव्यातील नवे सरकार स्थापन होईल. त्यामुळे सरकारने घिसाडघाईने नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याची तसेच पंचायत फेररचना प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. नवीन सरकार येईपर्यंत थांबावे व ही प्रक्रिया विविध घटकांना विश्‍वासात घेऊन पूर्ण करावी. सध्या ही प्रक्रिया पूर्ण करण्यास 4 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत लोकांना हवी असल्यास वाढवण्यात यावी अशी मागणी कामत यांनी केली.

पेडण्यातील लोक मोपा लिंक रोड भूसंपादनाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने शांततेने ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. शेतकरी वर्गावर होणारा अन्याय दूर करा अन्यथा नवीन सरकार येईपर्यंत कळ सोसावी. जर सरकारने घिसाडघाईने हे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरूच ठेवल्यास राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकवटून त्याविरुद्ध आंदोलन उभारण्याचे ठरविले आहे. पुढील सरकार भाजपचे असेल यावर विद्यमान सरकारला विश्‍वास नसल्याने ही घिसाडघाई सुरू आहे. लोकशाहीत जे जनतेला हवे आहे ते घडायला हवे, असे ते म्हणाले.

‘विधिलिखित असेल, तर मुख्यमंत्री होईन’

2017 मध्ये काँग्रेसला जनतेने जास्त जागा दिल्या होत्या. मात्र, विधिमंडळ नेता निवडीसाठी झालेला विलंब त्याचा फायदा भाजपने उठवून काँग्रेसला सरकार स्थापन करण्यापासून वंचित राहावे लागले. यावेळी मात्र तशी चूक पुन्हा केली जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे. मागील चुकीसाठी मी गोव्याच्या जनतेसमोर जाहीर माफीही मागितली आहे. मला मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी मी प्रयत्नरत नाही. मात्र, जर विधिलिखित असेल तर ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. भाजपला सत्ता स्थापन करता येऊ नये यासाठी काँग्रेस पक्ष इतर पक्षांशी वाटाघाटी करील, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT