multisystem inflammatory syndrome in children Dainik Gomantak
गोवा

Goa: कोरोना नंतर ‘मिस्क सिंड्रोम’ ची आरोग्य यंत्रणेला धास्ती

दैनिक गोमन्तक

मडगाव - कोविड (covid19) च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसू शकतो, ही शक्यता गृहीत धरून राज्यातील आरोग्य यंत्रणा (Health system) सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांवर आघात करू शकणारा कोविडचा ‘मिस्क’ सिंड्रोम गोव्यात येऊ शकतो या धास्तीनेही त्यांना ग्रासले आहे.लहान मुलांना कोविडची सहसा बाधा होत नाही. पण, जगात काही ठिकाणी या सिंड्रोमची बाधा लहान मुलांना झाल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. कुठल्याही भागात कोविडची अत्त्युच लाट आलेली असते त्याच्या दोन ते सहा आठवड्यात या सिंड्रोमचे बालरुग्ण आढळू शकतात. गोव्यात अशी लाट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आली होती त्यामुळे हा महिना काळजी वाढविणारा असू शकतो अशी शक्यता प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आयरा आल्मेदा (Dr Ira Almeida) यांनी सांगितले.(In Goa after Corona Misc syndrome threatens the health system)

डॉ. आल्मेदा या सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्य असून तिसरी लाट आली तर त्यावर काय उपाययोजना केली जाऊ शकते हे ठरविणाऱ्या समितीच्या त्या तज्ज्ञ आहेत. त्या म्हणाल्या, तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर आघात होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून आम्ही या मुलांवर कसे उपचार करता येणे शक्य आहे, याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांना (health workers) देणे सुरू केले आहे असे त्यांनी सांगितले.

मिस्क सिंड्रोम हा कोविडचाच प्रकार असून तो लहान मुलांना ग्रासतो. ताप येणे, घसा दुखणे, अंगावर चट्टे येणे आदी या रोगाची लक्षणे असतात. केवळ 5 टक्के बालकांमध्ये याची तीव्र लक्षणे दिसू शकतात इतरांमध्ये तो सुप्तावस्थेत तो असू शकतो. अशा बालकांवर त्वरित उपचार होणे आवश्यक असते. त्यासाठी या रोगाची लक्षणे कशी ओळखावेत आणि उपचार कसे करावेत याचे प्रशिक्षण कर्मचऱ्याना दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मडगावच्या (Margao) जिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेश पाटील (Dr. Rajesh Patil) यांनी अशी तिसरी लाट आली तर तिच्याशी दोन हात करण्यासाठी इस्पितळ प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. या इस्पितळात 570 खाटांची सोय आहे. इस्पितळातील बाल उपचार विभाग सूसज्ज असून याशिवाय बाल अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आलेला आहे. इस्पितळातीळ व्हेंटिलेटरचा या मुलांसाठी कसा वापर करता येणे शक्य आहे त्याचाही अभ्यास चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोविड’सारखाच ‘सिंड्रोम’ विषाणू

मिस्क (multisystem inflammatory syndrome in children) सिंड्रोम हा कोविडचाच एक विषाणू आहे. लहान मुलांच्या प्रतिकार शक्तीवर तो आघात करतो. एप्रिल 2020 मध्ये हा सिंड्रोम सर्वात प्रथम ‘युके’मध्ये आढळला. त्यानंतर युरोप, कॅनडा, अमेरिका, दक्षिण आफ्रिका येथे या सिंड्रोमने बाधित झालेली मुले आढळून आली. आशियात चीन आणि इतर कोविड बहुल देशातही असे रुग्ण आढळून आले होते. कोविडची लाट सर्वात जास्त असते त्याच्या दोन ते सहा आठवड्यात हा सिंड्रोमचे रुग्ण सापडण्याची शक्यता असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT