In five years, 69 sarpanches and 47 deputy sarpanches have been replaced in the Salcete panchayat DanikGomantak
गोवा

‘सासष्टी’तील पंचायतीत संगीत खुर्चीचा खेळ; पाच वर्षांत बदलले 69 सरपंच, 47 उपसरपंच

सत्ता वाटून घेण्याच्या खेळात महिलाही मागे नव्हत्या

दैनिक गोमन्तक

मडगाव : पंचायतींना पुरेसे अधिकार व विकासकामांसाठी निधी सरकार देत नाही, अशा तक्रारी सर्रास केल्या जातात. पण, असे असतानाही गेल्या पाच वर्षात सासष्टी तालुक्यातील तीस पंचायतीत 69 सरपंच व 47 उपसरपंच बदललेले पहायला मिळाले. तरीही लक्षणीय बाब म्हणजे सहा पंचायतीत एकच सरपंच व उपसरपंच यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या पंचायती म्हणजे वेळ्ळी, धर्मापूर-सिर्ली, तळावली, कामुर्ली, बेतालभाटी व ओडली या होत. उरलेल्या 24 पंचायतीतील 19 पंचायतीत झालेला बदल हा निवडून आलेल्या प्रतिनिधीतील अंतर्गत समझोत्यानुसार होता. (In five years, 69 sarpanches and 47 deputy sarpanches have been replaced in the Salcete panchayat)

तालुक्यात या कार्यकाळात सर्वाधिक सहा वेळा सरपंच बदल झाला तो वारका व रुमडामळ येथे. रुमडामळमध्ये असे सतत सरपंच बदलले जात असताना मधुकला शिरोडकर या मात्र तब्बल पाच वर्षे उपसरपंचपदी अढळ राहिल्या. या सत्ता वाटून घेण्याच्या खेळात महिलाही मागे नव्हत्या. सरपंचपद महिलांसाठी राखीव असलेल्या दवर्ली दिकरपाल पंचायतीत पाच सरपंच पहायला मिळाले. फ्लेन्सी फर्नांडिस यांची उचलबांगडी झाल्यावर चार महिलांनी आपसात हे पद वाटून घेतले.

नुवे पंचायतीत सर्वाधिक चार उपसरपंच झाले. तर दवर्ली दिकरपाल, तळावली, काना बाणावली व वारका येथे तीन उपसरपंच पहायला मिळाले. पाच पंचायतीत सरपंचांनी एकतर राजीनामा दिला वा त्यांना पदच्युत केले गेले. पारोडा व सार्झोरा येथे सुरवातीस इनासियो तेरेजा व साबिता मास्कारेन्हस यांची सरपंचपदी निवड झाली होती. पण, नंतर त्यांना हटविले गेले व उभयतांनी त्या प्रकरणात स्थानिक आमदारांवर ठपका ठेवला होता.

चिंचिणी देऊसा येथे प्रथम सरपंच निवडल्या गेलेल्या फ्लोरी परैरा यांनी राजीनामा दिला होता. करमणेत सरपंचांनी राजकीय निष्ठा बदलल्याने त्यांना हटविले गेले होते. तल चांदर कावेरीत सरपंच सेलिना कोएलो यांनी राजिनामा दिला होता. तर उपसरपंच माफाल्दिना फर्नांडिस यांना हटविले गेले होते. संगीत खुर्चीच्या या खेळाबद्दल नापसंती व्यक्त करून रायचे भूतपूर्व सरपंच झेव्हीयर फर्नांडिस यांनी पंचायतमंत्र्यांना एक निवेदन सादर करून निवडून आलेल्या पंचांना सरपंच वा उपसरपंच बनण्यासाठी काही निकष तयार करावेत, असे त्यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT