Vijay Sethupathi At IFFI Goa 2023 
गोवा

IFFI Goa: 'मेथड अ‍ॅक्टिंग काय असते मला माहित नाही', विजय सेतुपतीने सांगितले अभिनयाचे गुपित

अभिनयाचे कोणतेही वेगळे सूत्र नाही - विजय सेतुपती

Pramod Yadav

Vijay Sethupathi At IFFI Goa 2023: 'मेथड अ‍ॅक्टिंग काय असते मला माहित नाही, मी आशय समजून घेतो, दिग्दर्शक, लेखकाला काय सांगायचे आहे, याची माहिती घेतो आणि भूमिका साकारतो, असे दक्षिणेतील सुपरस्टार विजय सेतुपतीने उत्तर दिले.

इफ्फीत आयोजित 'इन- कन्व्हर्सेशन' या संवाद सत्रात अभिनेता विजय सेतुपती बोलत होता. अभिनेत्री खुशबू सुंदरने विजयची मुलाखत घेतली. 'लिव्हिंग द कॅरेक्टर' या विषयावर विजयने मतं मांडले.

भूमिकांसाठी तयारी करताना चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांबरोबर चर्चा आणि संवादातून मी शिकत गेलो. मेथड अ‍ॅक्टिंग काय असते मला माहित नाही, मी आशय समजून घेतो. अभिनयाचे कोणतेही वेगळे सूत्र नाही. कलाकारांनी व्यक्तिरेखा पूर्णपणे जगण्याची गरज असते, असे मत विजय सेतुपती यांनी मांडले.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिलेल्या सुपर डिलक्स या चित्रपटातील ट्रान्सजेंडरच्या व्यक्तिरेखेबाबत सेतुपती यांना प्रश्न विचारण्यात आला. ट्रान्सजेंडर व्यक्तींना सामोरे जावे लागत असलेल्या जीवनातील संघर्षांचे चित्रण या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केल्याचे सेतुपती म्हणाले.

खलनायकाच्या भूमिकेच्या निवडीबद्दल विचारले असता सेतुपती यांनी विशिष्ट भूमिकांपुरते मर्यादित न राहता, पटकथेच्या आधारे विविध भूमिका करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, असे उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

SCROLL FOR NEXT