Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चिठ्ठी लिहून वृद्ध बहीण - भावाने संपवले जीवन; घरात सापडले मृतदेह, हळदोणात खळबळ

Goa Crime News: म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, दोघांनी टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण शोधले जात आहे.

Pramod Yadav

म्हापसा: चिठ्ठी लिहून वृद्ध बहीण - भावाने जीवन संपवल्याची घटना हळदोणा येथून समोर आली आहे. दोघांचेही मृतदेह घरात आढळून आल्याने हळदोणात खळबळ निर्माण झालीय. गुरुवारी (०५ डिसेंबर) संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सेबेस्टीन कार्दोझ (वय. 68, रा. हळदोणा) आणि अवलिना कार्दोझ (वय. 72, रा. हळदोणा) अशी मृत भावंडाची नावे आहेत. सेबेस्टीन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे तर, अवलिना यांचा मृतदेह बेडवरुन आढळून आला आहे. पोलिसांना घटनास्थळावरुन एक सुसाईड नोट (चिठ्ठी) मिळाली असून, यात काय लिहलंय याची माहिती अद्याप समोर आलेले नाही.

म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, दोघांचे आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. म्हापसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर, पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी, बाबलो परब घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

अग्रलेख: दरोडेखोरांना गोव्‍यात साह्य कुणी केले?

Goa Today's News Live: गोव्यात एक दिवसाची शासकीय सुट्टी; तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर

Asia Cup: भारतीय संघाने दवडली संधी! पात्रता लढतीत सिंगापूरची मुसंडी; युईयाँगचे शानदार प्रदर्शन

Horoscope: 'या' 3 राशींसाठी आजचा दिवस खास! मोठी बातमी मिळणार; आर्थिक घडी बसणार

SCROLL FOR NEXT